विहिरीचे बिल काढण्यासाठी ४ हजाराची लाच घेताना शाखा अभियंत्याला अटक


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गडचिरोली : 
बांधलेल्या विहिरीचे अखेरचे बिल काढण्यासाठी एका विधवा महिला शेतकºयाकडून ४ हजार रूपयांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या सिंचाई उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंत्याला रंगेहाथ अटक केल्याची घटना काल  १४ मार्च रोजी सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास गडचिरोली शहरातील सिंचाई उपविभाग कार्यालयात घडली. पितांबर मारोती बोदेले (५४) असे अटक करण्यात आलेल्या शाखा अभियंत्याचे नाव आहे.
शासनाच्या ११ हजार सिंचन विहिरी कार्यक्रमांतर्गत तक्रारदार हे आपल्या शेतात बांधलेल्या विहिरीचे अखेरचे बिल काढून देण्याच्या कामासाठी गडचिरोली येथील जि.प.सिंचाई उपविभाग कार्यालयातील शाखा अभियंता पितांबर बोदेले यांच्याकडे गेले असता, शाखा अभियंता बोदेले यांनी ५ हजार रूपये लाचेची मागणी केली. तक्रारदार महिलेने तडजोडीअंती ४ हजार रूपये लाच देण्याचे मान्य केले. मात्र तक्रारदार विधवा महिला शेतकरी असल्याने व त्यांची लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली येथील लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाच-लुचपत प्रतिबंधक विभागाने आज सायंकाळच्या सुमारास सिंचाई उपविभाग कार्यालयात सापळा रचून शाखा अभियंता बोदेले यांना तक्रारदार शेतकरी महिलेकडून ४ हजार रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक करण्यात आली. त्यामुळे सिंचाई उपविभागात खळबळ निर्माण झाली. 
सदर कारवाई नागपूर परिक्षेत्राचे पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलिस अधीक्षक राजेश दुल्लमवार, पोलिस उपअधीक्षक विजय माहुलकर, पोलिस उपअधीक्षक ज्ञानदेव घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक रवी राजुलवार, पोलिस हवालदार प्रमोद ढोरे, नथू धोटे, नायक पोलिस शिपाई सतीश कत्तीवार, सुधाकर दंडीकेवार, देवेंद्र लोनबले, पोलिस शिपाई महेश कुकुडकार, गणेश वासेकर, किशोर ठाकूर, सोनी तावाडे, चालक नायक पोलिस शिपाई तुळशिराम नवघरे, चालक पोलिस शिपाई स्वप्नील वडेट्टीवार यांनी केली.

Facebook  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-15


Related Photos