महत्वाच्या बातम्या

 वेकोलि चे नवनियुक्त कार्मिक व्यवस्थापक यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : बल्लारपूर वेस्टर्न कोल फिल्ड चे नवनियुक्त कार्मिक व्यवस्थापक सी.वी.एस. रामानुजम यांनी नुकतेच पदभार स्वीकारले. त्या निमित्य त्यांचे अजय दुबे प्रदेश महासचिव भाजपा कामगार मोर्चा, मिथिलेश पांडे जिल्हा सरचिटणीस भाजयुमो व कामगार नेता अभिषेक इदनुरी यांनी त्यांच्या सत्कार केला. रामानुजम यांनी याआधी बल्लारपूर परिसरात काम केले आहे. ते त्यांच्या क्षेत्रातील तज्ञ मानले जातात. त्यांना कामगार क्षेत्रातील सखोल अनुभव आहे.

तसेच कामगार नेते व भाजपा उत्तर भारतीय मोर्चा जिल्हा सरचिटणीस सुजित निर्मल यांनी प्रादेशिक कार्मिक व्यवस्थापक रामानुजम यांना निवेदन सादर करून बल्लारपूर उपक्षेत्रातील कामगार संस्थेच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये लाकडी कोर्ट बांधण्याची मागणी केली. निर्मल हे स्वयं वेकोलि स्तरावरील बॅडमिंटनपटू आहेत. लाकडी कोर्टमुळे खेळाडूंच्या खेळात सुधारणा होणार असून ते मोठ्या स्पर्धेसाठी स्वत:ची चांगली तयारी करू शकतील, असे सांगून रामानुजम यांनी निर्मल यांना लाकडी कोर्टसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.





  Print






News - Chandrapur




Related Photos