गुवाहाटी येथील राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये महाराष्ट्राच्या संघाने सादर केली राज्याची विविधांगी संस्कृती


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर
 : भारत सरकार, युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्रालय व राष्ट्रीय सेवा योजना क्षेत्रीय निर्देशालय, गुवाहाटी आसाम यांच्या संयुक्त विद्यमाने आसाम डॉन बास्को युनिव्हर्सिटी गुवाहाटी येथे राष्ट्रीय एकात्मता शिबिर ८  ते १४ मार्च  या कालावधीत पार पडले. या शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक विविधता सादर करून उपस्थितांचे मने जिंकले. 
सदर शिबिरात संपूर्ण भारतातून राष्ट्रीय सेवा योजनेचे पंधरा राज्यातील तसेच ईशान्येकडील ७ राज्याचे एकूण २७० स्वयंसेवक सहभागी झालेले होते. शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याच्या रासेयो संघाचे संघनायक प्रा. गुरुदास डी. बल्की (रासेयो कार्यक्रम अधिकारी, श्री शिवाजी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय राजुरा) यांच्या नेतृत्वाखाली गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीशी संलग्नित विविध महाविद्यालयातील दहा विद्यार्थी या शिबिरामध्ये महाराष्ट्र राज्याचा संघ म्हणून सहभागी झाले होते. 
 शिबिरात महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रातील सांस्कृतिक विविधता सादर केली. त्यामध्ये लावणी, कोळीनृत्य, गणपती विसर्जन, शिवाजी महाराजांचा पोवाडा,शेतकरी आत्महत्येवर आधारित लघुनाट्य आणि शेवटच्या दिवशी महाराष्ट्रातील प्रसिद्ध पंढरपूरची वारी सादर केली, पंढरीच्या वारीमध्ये संघनायक प्रा. गुरुदास बल्की यांनी सुद्धा स्वयंसेवकांसोबत सहभाग घेतला, महाराष्ट्राच्या संघाने महाराष्ट्रातील विविधांगी कला आणि सांस्कृतिक कार्यक्रम  सादर करून उपस्थित मान्यवरांना मंत्रमुग्ध केले. महाराष्ट्र राज्याच्या संघात टीम लिडर प्रा. गुरुदास डी. बल्की, विशाल शेंडे (श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा), प्रफुल निरुडवार (राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालय सावली), गौरव डोमेलवार (भगवंतराव महाविद्यालय एटापल्ली), एजाज शेख (सरदार पटेल महाविद्यालय चंद्रपूर), सुभाष नन्नावरे (ग्रामगीता महाविद्यालय चिमूर), कु प्रणाली डांगट (शांताराम पोटदुखे विधी महाविद्यालय चंद्रपूर), कु. इंद्रायणी निंदेकर (आंबेडकर महाविद्यालय चंद्रपूर), कु. सपना टोंगे (शरद पवार महाविद्यालय गडचांदूर), कु. दीपाली मारगाये,कु. प्रीती मुलेटी (वनश्री महाविद्यालय कोरची) इ. सहभागी झाले होते. 
कार्यक्रम अधिकारी प्रा. गुरुदास बल्की यांची निवड गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ. नामदेवराव कल्याणकर यांनी केली. या शिबिरामध्ये संपूर्ण भारतातील विविध राज्याचे रासेयो स्वयंसेवक सहभागी होऊन यामध्ये प्रत्येक राज्य आपल्या आपल्या राज्याच्या सांस्कृतिक विरासती वर या सात दिवसात प्रकाश टाकला.  राष्ट्रीय एकात्मता शिबिराचे वैशिष्ट्य म्हणजे इथे संपूर्ण राज्याचे रासेयो स्वयंसेवक सहभागी असल्यामुळे एक लघु भारताचे स्वरूप प्राप्त झाले होते. या शिबिरातून राष्ट्रीय एकात्मतेचा मंत्र संपूर्ण भारतात पसरविण्याचे कार्य राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवकांनी केला. 
सदर शिबीर डॉ. दीपक कुमार, प्रादेशिक संचालक, रासेयो क्षेत्रीय निर्देशालाय गुवाहाटी आसाम यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. 
महाराष्ट्राचे राष्ट्रीय सेवा योजना विभागीय संचालनालय पुणे चे संचालक के. व्ही. खादरीनर सिम्हा यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या संघाने या शिबिरात सहभाग घेतला. महाराष्ट्राच्या संघाची निवड राष्ट्रीय सेवा योजना विभाग गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली यांनी केली. तसेच गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे कुलगुरू डॉ. नामदेव कल्याणकर तसेच रासेयो संचालक डॉ. नरेश मडावी यांचे सहकार्य लाभले. यासाठी श्री शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. एम. वारकड तसेच महाविद्यालयातील संपूर्ण प्राध्यापक वृंद यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-14


Related Photos