महत्वाच्या बातम्या

 वर्धा उपविभागातील पोलिस पाटील पदभरतीसाठी आरक्षण जाहिर


- भरतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / वर्धा : वर्धा उपविभागातील वर्धा, देवळी व सेलू तालुक्यातील गावांमध्ये भरतीसाठी पोलिस पाटील पदाचे आरक्षण जाहिर करण्यात आले आहे. या पदभरतीसाठी पात्र उमेदवारांकडून ७ जुलै पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.    

वर्धा उपविभागातील ४१ गावातील पोलिस पाटील पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जाची ८ जुलै रोजी छाननी करुन यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. सदर यादीवर ११ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजेपर्यंत आक्षेप नोंदविता येणार आहे. १२ जुलै रोजी यादी जिल्हाधिकाऱ्यांना सादर करुन १३ ते २० जुलै या कालावधीत पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र निर्गमित करण्यात येईल. २२ जुलै रोजी जिल्हास्तरावर लेखी परिक्षा घेण्यात येईल व त्याच दिवशी परीक्षेचा निकाला जाहिर करण्यात येणार आहे.

त्यानंतर मुलाखतीस पात्र असलेल्या उमेदवारांची २३ जुलै रोजी यादी जाहिर करण्यात येणार आहे. २४ जुलै रोजी वर्धा, २५ जुलै रोजी देवळी व २६ जुलै रोजी सेलू तालुक्यातील उमेदवारांची तोंडी परिक्षा घेण्यात येणार असून उमेदवारांची अंतिम निवड २७ जुलै रोजी करण्यात येणार आहे. सदर पोलिस पाटील पदाच्या सरळसेवा भरती प्रक्रियेची सविस्तर माहिती https://wardha.ppbharti.in आणि www.wardha.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. या संकेतस्थळासह अधिक माहितीसाठी संबंधितांना उपविभागीय कार्यालय तसेच संबंधित तहसिल कार्यालयाशी संपर्क साधावा, असे उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos