महत्वाच्या बातम्या

 साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / नागपूर : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळामार्फत अनुसूचित जातीतील मांग, मातंग या समाजातील बारा पोटजातीतील विद्यार्थी-विद्यार्थिनीकरिता मंडळामार्फत शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी सन २००२२-२३ या शैक्षणिक वर्षात दहावी, बारावी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी या अभ्यासक्रमासाठी  सरासरी ६० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले असतील, अशा विद्यार्थी  किंवा विद्यार्थिनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन दीक्षाभूमी जवळ, महामंडळाच्या नागपूर येथील जिल्हा कार्यालयात शैक्षणिक कागदपत्रे, शिधापत्रिका, उत्पन्नाचा दाखला, एक फोटो यासह १५ जुलैपर्यंत संपर्क साधून अर्ज सादर करावे, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.         





  Print






News - Nagpur




Related Photos