१६ पासून चिमूरात पहीले अखिल भारतीय आंबेडकरवादी साहीत्य संमेलन


-संमेलनाध्यक्ष प्रा. दिपककुमार खोब्रागडे
-जेष्ठ साहित्यीक, कवी, लेखक यांचा होणार गौरव 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
तालुका प्रतिनिधी / चिमूर :
क्रांतीभूमीमध्ये शेतकरी भवनातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज साहित्यनगरी सभागृहात १६ व १७ मार्चला सकाळी ९ वाजता साहीत्य क्षेत्रात कार्यरत असलेली जागतिक आंबेडकरवादी साहीत्य महामंडळ नागपूर व्दारा पहीला अखील भारतिय आंबेडकरवादी साहित्य संमेलन   आयोजीत करण्यात आला आहे.
 शनिवार १६ मार्च ला सकाळी ९ वाजता संविधान गौरव रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या उद्धघाटन सत्राचे संमेलनाध्यक्ष नागपूर येथील सुप्रसिद्ध साहीत्यीक व विचारवंत प्रा. दिपककुमार खोब्रागडे राहणार असुन संमेलनाचे उद्धघाटन पुणे येथील अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे भुतपूर्व अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांचे हस्ते होणार आहे. अतिथी मार्गदर्शक  संघारामगिरी संघनायक पू. भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, सुप्रसिध्द नाटककार व लेखक, अ.भा. मराठी नाटय संमेलन मुंबई अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, आंतरराष्ट्रीय आंबेडकरवादी विचारवंत व संयुक्त राष्ट्रसंघाचे माजी प्रतीनिधी दिल्ली अशोक भारती, सुप्रसिद्ध अभ्यासिका डॉ. प्रभज्योत कौर आदी उपस्थीत राहणार असुन संमेलनाचे स्वागताध्यक्ष ॲड. भूपेश पाटील व सहस्वागताध्यक्ष सुरेश डांगे शिक्षक आहेत. 
 दुपारी २.३० वाजता आंबेडकरवादी साहित्याने भारतीय साहीत्याला दिलेले भरीव योगदान या विषयावर परिसंवाद होणार असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. शुध्दोदन कांबळे आहेत. डॉ. अनिल सुर्या, डॉ. सिद्धार्थ बुटले, डॉ. भुषण रामटेके, डॉ. रविद्रं तिरपुडे, डॉ. शंकर बागडे, डॉ.धनराज खानोरकर, डॉ हेमचंद दुधगवळी, प्रा. अमोल शेंडे, डॉ. उल्हास मोगलेवार, प्रा. भाऊराव पत्रे यांचा सहभाग राहनार आहे. दुपारी ४ वाजता  ओबीसीच्या विकासात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य या विषयावर परिसंवाद होनार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. राजेश ढवळे राहनार असुन ज्ञानेश्वर रक्षक, नितीन चौधरी, डॉ महेश मोरे, ज्योती तिरपुडे, डॉ विनोद भालेराव प्रा.बुद्धराजमुन, रमेशचंद्र येशनकर, डॉ देवमन कामडी, वासुदेव श्रीरामे, प्रकाश ब्राम्हणकर, रविद्रं उरकुडे यांचा सहभाग राहणार आहे. 
सायंकाळी ६ वाजता कविसंमेलन प्रतिनिधीचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रल्हाद बोरकर, प्रमुख अतिथी सदानंद लोखंडे, बापुराव टोंगे, भाऊराव पत्रे असुन जितेंद्र भोयर, नरेंद्र मेश्राम, सदाशीव नन्नावरे, प्रकाश मेश्राम, विजय भगत,मंजुषा साखरकर, अंजु येवले, वर्षा शेंडे, यशश्री यलसट्टीवार, सानिका येळणे, पुष्पा राऊत, रितीका करकाळे, सुकेशिनी बोरकर, तुलेश्वरी टिकले, सुजाता दरेकर, हर्षा सेलोकर, प्रज्ञा घोनमोडे, सोनाली सहारे, वंदणा हटवार, मनिषा धंदरे, अश्वीनी रोकडे, रजनी गेडाम, रजनी सुर्यवंशी, रसिका जिलटे, तनुजा बन्सोड, नरेंद्र सोनारकर, पुसाराम शिवरकर, निलकंठ बोरकर, संजय भैसारे , प्रशांत राऊत, डॉ. मधुकर खोब्रागडे आदीचा सहभाग राहणार आहे. 
 रविवार १७ मार्च ला सकाळी ९ वाजता कविसंमेलन निमंत्रिताचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आचार्य ना.गो. थुटे, प्रमुख अतिथी भानुदास पोपटे, शोभाताई कऊटकर  उपस्थीत राहणार असुन नरेशकुमार बोरीकर, रोशनकुमार पिल्लेवान, धनंजय साळवे, मिलेश साकुरवार, सिमा भसारकर, सुरेश वंजारी, रसपाल शेंदरे, संजय गोडघाटे, विजय मारेकर, प्रदीप मेश्राम, मंगेश जनबंधू, गौतम राउत, मनोहर गजभिये, प्रा. संजय तिजारे, रंगराज गोसावी, सुनिल वाडे, राजु डहाके, अंकुश सिंघाडे, प्रकाश कांबळे,रीना गायकवाड, संध्या बोकारे, शिला आठवले, स्वाती चनकापुरे, अहिल्या रंगारी, रजनी फुलझेले, नंदा खानोरकर, वैशाली धनविजय, पोर्णिमा विश्वास, डॉ. सुधीर मोते, प्रा. प्रियंका रामटेके, खुशाल कांबळी आदी चा सहभाग राहणार आहे.  दुपारी १२ वाजता स्त्रियांचे साहित्य आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ या विषयावर परिसंवाद होणार  असुन या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ सरिता जांभळे राहणार  आहेत . डॉ.विणा राऊत, डॉ सुनंदा रामटेके, डॉ विशाखा कांबळे, प्रा. प्रिती भाजीखाये, प्रा. डॉ. प्रशांत धनविजय, बंडोपंत बोढेकर , हर्षवर्धन डांगे, शारदा गेडाम, सुजाता गेडाम, सुजाता दरेकर, प्रा.बादल चव्हान आदीचा सहभाग राहणार आहे. दुपारी १२ वाजता राष्ट्रसंताच्या क्रांती भूमीतील आंबेडकरी चळवळ काल आज आणी उद्या या विषयावर परिसंवाद होणार असुन कार्यक्रमाचे अध्यक्ष धनराज गेडाम उपस्थीत राहनार असुन ॲड दिलीप रामटेके, धर्मदास मेश्राम, किशोर अंबादे, भानुदास पोपटे, शनैशचंद्र श्रिरामे, प्रकाश पाटील, रामदास कामडी, डॉ अविनाश ढोक, हरी मेश्राम यांचा सहभाग राहणार आहे. दुपारी ४ वाजता संमेलनाचा समारोप या कार्यक्रमाचे अध्यक्ष संमेलनाध्यक्ष प्रा. दिपककुमार खोब्रागडे, मार्गदर्शक संघमागीरी संघनायक पु.भदन्त ज्ञानज्योती महाथेरो, प्रमुख अतिथी दिल्लीचे अशोक भारती, नागपूरचे डॉ. इंद्रजित ओरके, स्वागताध्यक्ष ॲड भुपेश पाटील, सहस्वागताध्यक्ष सुरेश डांगे यांच्या हस्ते जेष्ठ साहीत्यीक, कवी, लेखक, आयोजक, संयोजक समिती यांचा पुरस्कार प्रदान समारंभ होणार आहे.
 चिमुर क्रांतीभूमीत होणाऱ्या पहील्या अखील भारतीय आंबेडकरवादी साहित्य संमेलनाला परिसरातील नागरीकांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.  Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-14


Related Photos