महत्वाच्या बातम्या

 युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यार्थ्यांना महाज्योतीतर्फे ५० हजार रुपयांचे अर्थसहाय्य


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / नागपूर : शासनाच्या इतर मागास बहुजन कल्याण विभागाची स्वायत्त संस्था असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत (महाज्योती) इतर मागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील  विद्यार्थ्यांना युपीएससी मुख्य परीक्षेकरीता पात्र विद्यर्थ्यांना ५० हजार रुपयांचे एकरकमी अर्थसहाय्य योजनेकरीता महाज्योतीतर्फे ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.

उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असावा. तसेच नॉन क्रिमीलेअर गटातील इतर मागासवर्गीय, भटक्या जाती, विमुक्त जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गापैकी असावा. विद्यार्थी हा १२ जून २०२३ रोजी केंद्रीय लोकसेवा आयोग पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेला असावा. केंद्रीय लोकसेवा आयोग मुख्य परीक्षेसाठी पात्र असावा. ज्या उमेदवारांना परीक्षेसाठी इतर संस्था किंवा सारथी, पुणे कडून अर्थसहाय्य मिळत आहे किंवा त्यासाठी अर्ज केला आहे, अशा उमेदवारांना या योजनांच्या लाभासाठी अर्ज करता येणार नाही, याची नोंद घ्यावी.

अर्ज करण्यासाठी आधार कार्ड, रहिवासी दाखला, जात प्रमाणपत्र, वैध नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र, पूर्व परीक्षेचे प्रवेश पत्र, बँकेचे तपशील, पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रत आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रासह माहाज्योतीच्या www.mahajyoti.org.in या संकेतस्थळावर जाऊन अर्ज करायचा आहे. नोटीस बोर्डवर अर्ज करण्याबाबत मार्गदर्शक तपशील दिलेला आहे. अर्ज करण्याची अंतिम ३ जुलै २०२३ नमुद करण्यात आलेली आहे.

अर्ज भरताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी असल्यास महाज्योतीच्या कॉल सेंटरवर ०७१२-२८७०१२०/२१ या क्रमांकावर संपर्क साधावा. याआधी केंद्रीय लोकसेवा आयोग - पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी पात्र नॉन क्रिमीलेअर गटातील उमेदवारांना १५ हजार रुपये देण्याची तरतूद होती. ती आता ५० हजार रुपये करण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आभार मानले आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos