महत्वाच्या बातम्या

 महाज्योतीच्या प्रशिक्षणांचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास मुदतवाढ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / वर्धा : महात्मा जोतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्थेमार्फत जेईई, नीट, एमएचटी-सीईटी करिता १० वी नंतर प्रशिक्षण देण्यात येते. सदरचे प्रशिक्षण हे दोन वर्षासाठी असून त्यासाठी विद्यार्थ्यांना मोफत टॅब व दररोज ६ जीबी डेटा देण्यात येतो. १० वी उत्तीर्ण झालेल्या व विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या या प्रशिक्षणाचा लाभ होणार आहे. या करिता इच्छुक उमेदवारांना ०५ जुलै पर्यत अर्ज करण्यासाठी मुदतवाढ दिलेली आहे.

सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याने विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा, विद्यार्थी हा इतरमागास वर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती किंवा विशेष मागास प्रवर्गातील असावा. तसेच तो नॉनक्रिमिलेअर गटातील असावा. योजनेच्या संदर्भातील सर्व अटी व शर्ती या महाज्योतीच्या www.mahajyoti.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेल्या असून विद्यार्थ्यांनी या संकेतस्थळावरील सुचना फलकात जाऊन प्रशिक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन महाज्योतीचे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांनी केले आहे.

ज्या उमेदवारांनी या आधी जेईई, नीट, एमएचटी-सीईटी प्रशिक्षणासाठी अर्ज केलेले आहेत मात्र कागदपत्रांची पूर्तता केलेली नाही, अशा उमेदवारांना त्यांचे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी १५ जुलै पर्यंत मुदतवाढ दिलेली आहे. ज्या उमेदवारांनी कागदपत्रांची पुर्तता केलेली नाही अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन देखील महाज्योती मार्फत करण्यात आलेले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos