महत्वाच्या बातम्या

 कंत्राटी तत्वावर क्षेत्रीय अधिकारी पदासाठी अर्ज आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / वर्धा : आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना या केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी तथा कृषि प्रक्रिया तंत्र सहाय्यक या पदासाठी कंत्राटी तत्वावर सेवा घेण्यात येणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी १० जुलै पर्यंत अर्ज सादर करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

अर्जदाराने मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवी घेतली असावी, यामध्ये बी.एससी (कृषि/फलोत्पादन), बी.टेक (अन्न/कृषि) अभ्यासक्रमाला प्राधान्य देण्यात येणार आहे. पदव्यूत्तर एम.बी.ए. मध्ये फायनन्स/प्रोडक्शन, मॅनेजमेंट बिजनेसला प्राधान्य देण्यात येईल. एम.टेक.(अन्न), एम.एस.सी मध्ये कृषि, फलोत्पादन, अन्न विषयाचा अभ्यासक्रम घेतलेला असावा. एमएससीआयटी अनिवार्य तसेच इंग्रजी, मराठी, टायपिंग आवश्यक असून किमान २ वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. सदर पदासाठी निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना २८ हजार ८०० रुपये प्रति महिना देय राहील. अर्जाचा नमुना, अटी व शर्ती जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.wardha.gov.in संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी यांनी कळविले आहे.





  Print






News - Wardha




Related Photos