महत्वाच्या बातम्या

 बकरी ईद सणाच्या अनुषंगाने जिल्ह्यामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतीनिधी / भंडारा : बकरी ईद सणाच्या अनुषंगाने पशुसंवर्धन कार्यालय, नगर परिषद, पोलीस विभाग, परिवहन विभाग व आदी विभागांची बैठक जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालय येथे २७ जून रोजी घेण्यात आली.

जिल्ह्यामध्ये बकरी ईद सणानिमित्य जनावरांची कत्तल/कुर्बानी देण्यात येते. जनावरांची कुर्बानी दिल्या नंतर जमा झालेला मलबा, घाण इतरत्र न फेकता योग्य विल्हेवाट लावावी, असे निर्देश यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी यावेळी संबंधीत विभागांना दिले.

या बैठकीमध्ये पशुसंवर्धन विभाग, नगर परिषद विभाग, पोलीस विभाग, परिवहन विभाग व आदी विभागांनी घ्यावयाच्या  खबरदारी, महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा, प्राणिकलेश प्रतिबंधक कायदा, जनावरे वाहतूक करतांना बाळगावयाची प्रमाणपत्रे व स्वास्थ्य प्रमाणपत्रे या विषयी विस्तृत माहिती यावेळी सर्व विभागांना देण्यात आली.

जिल्ह्यामध्ये जनावरांच्या तपासणीकरिता खालील सक्षम अधिकारी व मदतनीस यांची २६ जून ते १ जुलै २०२३ पर्यंत नियुक्ती करण्यात आली आहे.





  Print






News - Bhandara




Related Photos