खेडी येथे जागतिक महिला दिनानिमित्य विविध कार्यक्रमांचे आयोजन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / कवठी (सावली) : 
खेडी येथे महिला शक्ती ग्रामसंघाचे वतीने बचतगटाच्या ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून विविध कार्यक्रम घेऊन जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. 
 महिला ग्रामसंघ, महिला बचतगट खेडी नी उमेद ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या माध्यमातून जनजागृती रॅली, कबड्डी स्पर्धा, मिनी मॅरेथॉन, रांगोळी स्पर्धा, मार्गदर्शन कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व गावभोजन करून महिला दिन उत्साहात साजरा केला. कबड्डी स्पर्धेत पेंढरी येथील महिला चमूने प्रथम क्रमांक तर दुसरा क्रमांक खेडी चमूने, मॅरेथॉन स्पर्धेत प्रथम कल्याणी काटपलिवार ,द्वितीय वैशाली कँचावार, रांगोळी स्पर्धेत प्रथम कल्याणी काटपलिवार, द्वितीय वैशाली कोरेवार यांनी पटकाविला. सांस्कृतिक स्पर्धेत एकल नृत्य रिता उईके प्रथम तर द्वितीय जयमाला गडमवार, गीत गायन स्पर्धेत नंदिनी अलाम प्रथम तर द्वितीय संगीता गदेवार,  समूहनृत्य खेडी गटाने प्रथम, बोथली गटाने दुसरा क्रमांक तर नाटिकेत खेडी गटाने प्रथम तर चांदली गटाने द्वितीय क्रमांक पटकाविला. खेडी, चांदली बूज, बोथली, पेंढरी येथील महिला स्पर्धेत सहभागी झाले होते.  
कार्यक्रमाचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य विजय कोरेवार यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी सरपंच मोहिनी भडके, उपसरपंच नरेंद्र राचेवार, पोलीस पाटील कृपाल दुधे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष राखी म्यानावार, डॉ धनश्री मर्लावार, उमेदचे कल्पना देवाडकर, विजयाश्री गेडाम, प्रतीक्षा गेडाम, बँक व्यवस्थापक रिंकेश बेहरा, मुख्यध्यापिका जिरकुंटवार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे आयोजन महिला शक्ती ग्रामसंघ चे अध्यक्ष छाया कोसरे, नीता नागपुरे, श्यामला येलेंट्टीवार व सर्व महिला बचत गटाच्या कार्यकर्त्यांनी केले.   Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-14


Related Photos