मुद्रणालयांनी निवडणूक साहित्य छपाईसाठी लोकप्रतिनिधीत्व कायदयाचे पालन करावे


-उल्लंघनकरणाऱ्या  व्यक्तीस ६ महिने कारावास व २ हजार रुपये दंडाची शिक्षा
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा :
केंद्रिय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकीची घोषणा केलेली आहे. त्यानुसार वर्धा जिल्हयात ११  एप्रिल रोजी निवडणूक होणार आहे. लोकसभा निवडणूकीमध्ये निवडणूक लढविणारे उमेदवार मुद्रणालयाकडून प्रचाराचे साहित्य छपाई करणार आहे. यासाठी जिल्हयात मुद्रणालयांनी
लोकप्रतिनिधीत्व कायदा १९५१ चे कलम १२७ ए नुसार कायदयाचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी विवेक भिमनवार यांनी केले आहे.
मुद्रणालयांनी पॉम्पलेट, भिंतीपत्रक इत्यादी साहित्य प्रकशनावरील प्रतिबंधात्मक लोकप्रतिनिधीत्व कायदयानुसार निवडणूक साहित्याची छपाई करतांना भिंतीपत्रक, पॉम्पलेट इत्यादीच्या मुखपृष्ठावर मुद्रक, प्रकाशकाचे नाव, मोबाईल क्रमांक व पत्ता, किती प्रतीची संख्या मुद्रीत करणे बंधनकारक आहे. कलम १२७ A (२) नुसार साहित्य छपाईसाठी आणणा-या प्रकाशकास स्वत:ची ओळख इतर दोन साक्षदारांच्या व स्वत:च्या स्वाक्षरीने प्रमाणित करुन ती मुद्रकास देणे बंधनकारक राहील. त्यानंतर मुद्राकांनी छपाई करण्यात आलेले साहित्य व प्रमाणित ओळख पत्राची प्रत ४ प्रतित ३ दिवसाचे आत छपाईसाठी आलेल्या खर्चासह जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांचेकडे सादर करणे अनिवार्य आहे.
सदर कायदयाचे उल्लंघन करणा-या व्यक्तीस ६ महिण्याचा कारावास किंवा २ हजार रुपये पर्यंतचा दंड किंवा दोन्ही ठोठावण्याची तरतूद कायदयात आहे. निवडणूक प्रचार साहित्यावर कुठल्याही धर्म, वंश, जात, समुदाय किवा भाषा किंवा विरोधी पक्षाचे किंवा उमेदवारांचे चारित्र्याचे हणन होईल अशी शब्द रचना, वाक्य वा मुद्दे मुद्रीत करु नये, अशी बाब शिक्षेस पात्र राहील. दुचाकी तीन चाकी, चार चाकी व ई रिक्षा वाहनावरील लावण्यात येणा-या झेंडयाचा आकार हा १ फुट X अर्धा फुट किंवा या आकाराचे स्टिकर्स लावता येईल. परंतु या वाहनावर बॅनर लावण्यास प्रतिबंध आहे. प्रचार फेरी दरम्यान सदर आकारात जिल्हाधिकारी यांनी प्रचार वाहन म्हणुन परवाणगी दिलेल्या एकाच वाहनावर झेंडा लावता येईल यासाठी झेडयांच्या खांबाची किंवा काडी उंची ३ फुट पेक्षा जास्त नसावी. प्रचार फेरीत जे बॅनर हातात पकडण्यासाठी तयार करण्यात येईल त्यांचा आकार ६ फुट X साडेचार फुट असावा, असे जिल्हानिवडणूक अधिकारी यांनी कळविले आहे.  Print


News - Wardha | Posted : 2019-03-14


Related Photos