महत्वाच्या बातम्या

 गडचिरोली जिल्ह्यात तलाठी भरतीत ओबीसींवर अन्याय : माजी मंत्री विजय वडेट्टीवार


- नव्याने भरती प्रक्रिया घेण्याची मागणी

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : राज्यात तलाठ्यांची ४ हजार ६४४ पदे भरण्याची जाहिरात महाराष्ट्र शासनाच्या महसुल विभागाने नुकतीच प्रकाशित केलेली आहे. यात गडचिरोली जिल्हयात १५८ पदांपैकी पेसा क्षेत्रातून १५१ पदे व पैसा विरहीत क्षेत्रातुन ७ पदे भरण्याची जाहिरात प्रसिध्दिस आली आहे. यात ओबीसी प्रवर्गासाठी एकही जागा आरक्षीत नसल्याने ओबीसी प्रवर्गातील होतकरू उमेदवारामध्ये प्रचंड नाराजी पसरली असुन ओबीसींवर अन्याय होत असल्याबाबतचे तीव्र पडसाद उमटत आहेत.

होऊ घातलेल्या भरती प्रक्रियेत शासनाच्या वतीने ओबीसींना डावलून लावण्याचा येत असुन भविष्यात ओबीसी समाजातील तरुण-तरुणी रोजगारापासुन वंचित राहणार असे घडल्यास ओबीसी समाजाच्या भावनांचा उद्रेक होऊन शासनाला मोठ्या जनआकोशाला सामोरे जावे लागेल अशी परिस्थिती निर्माण होऊ नये करिता हाऊ घातलेली भरती प्रक्रिया तातडीने रद्द करून ओबीसी प्रवर्गाला आरक्षित स्थान देवून नव्याने भरती प्रक्रिया घेण्यात यावी अशी मागणी राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, ओबीसी नेते, आ. विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

राज्यात महाविकास आघाडी सरकारच्या काळात गडचिरोली जिल्ह्यातील वर्ग ३ व वर्ग ४ च्या पदभरती मध्ये ओबीसींना १८ टक्के आरक्षण देण्यात आले होते. मात्र राज्यात झालेल्या सत्ता बदलानंतर राज्यातील ओबीसींवर पुन्हा अन्याय सुरू झाला आहे. राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरतीमध्ये ओबीसी उमेदवारांवर मोठा अन्याय होत असल्याची माहिती पुढे आली आहे. 

महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झालेल्या शासन निर्णयानुसारच सध्याच्या सरकारने भरती करावी, अन्यथा ओबीसींच्या रोषाला पुढे जाण्याची तयारी ठेवावी असा इशाराही यावेळी माजी कॅबिनेट मंत्री, ओबीसी नेते आ. विजय वडेट्टीवार यांनी दिला आहे.





  Print






News - Gadchiroli




Related Photos