महत्वाच्या बातम्या

 मोटरसायकलचा अपघात : मामासह भाचीचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : एटापल्ली येथील महाविद्यालयात पदवीच्या पहिल्या वर्षाला प्रवेश घेण्यासाठी येत असताना दुचाकीची झाडाला धडक बसल्याने मामा व चुलत भाची गंभीर जखमी झाली. यात मामा जागेवरच ठार झाला. मामाला रुग्णालयात नेण्यासाठी गंभीर जखमी झालेली भाची मार्गाने ये-जा करणाऱ्यांना विनवणी करत होती. अखेर तिचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

ही हृदय पिळवटून काढणारी घटना एटापल्ली तालुक्यातील वेलमागड गावाजवळ घडली. नथ्थू पुस्सु हचामी (२५) रा. जीवनगट्टा असे मामाचे तर रोशनी बंडू पदा (२२) रा. पिपली (बुर्गी) असे भाचीचे नाव आहे.

माहितीनुसार नथ्थू हिचामी हा कामानिमित्य बहिणीच्या घरी पिपली (बुर्गी) गावाकडे गेला होता. तो आपल्या गावी जिवनगट्टा येथे परत येण्यासाठी निघाला. नथ्थूची चुलत भाची रोशनी हिला एटापल्ली येथील महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा होता. त्यामुळे ती एटापल्लीपर्यंत येण्यासाठी नथ्थूच्या दुचाकीवर बसली. पिपली (बुर्गी) वरून निघाल्यानंतर गावाजवळून चार किमी अंतरावर वेलमागड गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने दुचाकीने झाडाला धडक दिली. या अपघातात नथ्थूचा जागीच मृत्यू झाला. रोशनी गंभीर जखमी झाली. तिला पिपली (बुर्गी) गावात नेल्यानंतर तिचाही काही वेळाने मृत्यू झाला. नथ्थूचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. तो शेतीची कामे करायचा. रोशनी बारावी उत्तीर्ण झाली होती. तिला पुढचे शिक्षण घ्यायचे होते. मात्र, काळाने मध्येच घाला घातला आणि तिचे स्वप्न काळाच्या पडद्याआड गेले.





  Print






News - Gadchiroli




Related Photos