५०० रुपयांची लाच रक्कम स्वीकारनारा मुल सिंचन विभागातील मोजणीदार एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर :
शेता जवळील नाल्यावरुन वैयक्तीक पाणी आणण्याकरिता उपसा सिचंन परवाना देण्याची फाईल तयार करुन उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग मुल यांचेकडे पाठविण्याकरिता १ हजार रुपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती ५०० रुपये स्वीकारतांना एसीबीच्या पथकाने मुल सिंचन अधीकारी कार्यालयातील मोजणीदारास रंगेहात अटक केली आहे . सचिन हरिश मोगरे (३८) असे लाचखोर मोजणीदाराचे नाव आहे . 
तक्रारदार हे हळदी पोस्ट चिचाळा तह. मुल जिल्हा चंद्रपूर येथील रहीवासी असुन शेत मजुरीचे काम करतो. तक्रारदाराचे नावे हळदी येथे गावगन्ना अंतर्गत सर्वे नं. ९५ मध्ये ०. ६१ आर. शेतजमीन आहे. सदर शेता लगत असलेल्या नाल्यावरुन शेता मध्ये मोटार पंपाव्दारे पाणी आणने कामी शाखा अधिकारी सिंचन शाखा मुल कार्यालय येथे तक्रारदाराने अर्ज केलेला होता. सदर अर्जावर कोणती कारवाई करण्यात आली.  त्याबाबत तक्रारदार हे शाखा अधिकारी सिचंन विभाग मुल कार्यालय येथे गेले असता तेथील कार्यरत सचिन हरिश  मोगरे यांना भेटले असता त्यांनी तक्रारदारास तक्रारदाराचे शेता जवळील नाल्यावरुन वैयक्तीक पाणी उपसा सिचंन परवाना देण्याची फाईल तयार करुन उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग मुल यांचेकडे पाठविण्याकरिता १ हजार रु. लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर येथे तक्रार नोंदविली.  तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा रचून कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान सचिन हरिश  मोगरे, मोजणीदार, कार्यालय शाखा अधिकारी सिचंन विभाग मुल जिल्हा चंद्रपूर यांनी तक्रारदाराचे शेता जवळील नाल्यावरुन वैयक्तीक पाणी उपसा सिचंन परवाना देण्याची फाईल तयार करुन उपविभागीय अभियंता पाटबंधारे उपविभाग मुल यांचेकडे पाठविण्याकरिता १ हजार रू लाचेची मागणी करून तडजोडअंती ५०० रू लाच रक्कम
स्विकारली. त्यावरून आरोपी विरूध्द आज दि. १३ मार्च रोजी पोलीस स्टेशन मुल जि. चंद्रपूर येथे कलम ७ लाचलुचपत प्रतिबंध १९८८ (संषोधन अधिनियम २०१८) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर कार्यवाही श्रीकांत धिवरे, (अतिरिक्त कार्यभार) पोलीस उपायुक्त/पोलीस अधिक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर,  राजेश  दुद्दलवार, अपर पोलीस अधिक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नागपूर यांचे मार्गदर्शनात डी.एम.घुगे, ला.प्र.वि चंद्रपूर यांचे मार्गदर्शनात  पुरुषोत्तम चोबे, पोलीस निरीक्षक तसेच कार्यालयीन स्टाॅफ नापोकाॅ. महेश मांढरे, संतोष येलपूलवार, अजय बागेसर, रवि ढेगंळे, व चापोकाॅ. राहूल ठाकरे सर्व लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, चंद्रपूर यांनी  केली आहे.    Print


News - Chandrapur | Posted : 2019-03-13


Related Photos