महत्वाच्या बातम्या

 भाजप उत्तर भारतीय आघाडी महिला मोर्चा तर्फे उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / बल्लारपूर : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा भाजपा उत्तर भारतीय मोर्चा चे जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी यांच्या नेतृत्वात भाजपा उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या वतीने सत्कार करण्यात आला.  यावेळी उत्तर भारतीयांचा सर्वात मोठा सण असलेल्या छठ पूजेचा स्मृतिचिन्ह  देऊन उपमुख्यमंत्र्यांचा सत्कार करण्यात आला.

हा सत्कार भाजपा उत्तर भारतीय महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष वंदना सिन्हा यांनी त्यांच्या संपूर्ण पदाधिकारीसह केला. यावेळी महिला सरचिटणीस ममता राजभर, जिल्हा सरचिटणीस संजय राय, शहराध्यक्ष अमन सिंग, प्रभा आदी महिला उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, ओबीसी आयोगाचे राष्ट्रीय अध्यक्ष हंसराज भैय्या अहिर, भाजपचे ज्येष्ठ नेते चंदनसिंह भैय्या चंदेल, भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भद्रावती प्रभारी रमेश राजूरकर, रामपाल सिंग, अलका आत्राम, भाजप भारतीय मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रुद्रनारायण तिवारी आदी उपस्थित होते.





  Print






News - Chandrapur




Related Photos