लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०१९ : परवाना धारकांना शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध


विदर्भ न्यूज एक्सप्रेस  
प्रतिनिधी / गोंदिया :
अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अन्वये दिलेल्या शक्तीचा वापर करुन गोंदिया जिल्ह्यातील शस्त्र परवाना धारकांना लोकसभा सार्वत्रिक निवडणूक आचारसंहितेच्या कालावधीत शस्त्राची वाहतुक व सार्वजनिक ठिकाणी शस्त्र बाळगण्यास प्रतिबंध केले आहे. सर्व शस्त्र परवाना धारकांनी त्यांचेकडील शस्त्र आचारसंहिता कालावधीत पोलीस विभागाकडे जमा करावे.
ज्या व्यक्तींना निवडणूक कालावधीत स्वत:जवळ शस्त्र बाळगण्याची, वाहून नेण्याची आवश्यकता असेल अशा व्यक्तींनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांचेमार्फत जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक राहील. पोलीस विभागाच्या शिफारशी लक्षात घेवून त्यानंतर अर्जावर कार्यवाही करण्यात येईल. छाननी समितीच्या निर्णयानुसार बँकांना या आदेशातून सूट देण्यात येत आहे. सदर आदेश ११ मार्च पासून ते ३१ मे २०१९ या कालावधीकरीता अंमलात राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द योग्य ती कार्यवाही करण्यात येईल. असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी गोंदिया यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.  Print


News - Gondia | Posted : 2019-03-13


Related Photos