गंगाझरी पोलीस ठाण्यातील नायक पोलीस शिपाई एसीबीच्या जाळ्यात


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गोंदिया :
अवैध दारु विक्रीची कार्यवाही न करण्याकरीता तक्रारदाराकडे मासिक हप्त्या म्हणून १ हजार ५०० रुपये लाचेची मागणी करून लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या गंगाझरी पोलीस ठाण्यातील नायक पोलीस शिपायास एसीबीच्या पथकाने पकडले आहे . देवेंद्र शिवलाल चोपकर (३२) असे लाचखोर नायक पोलीस शिपायाचे नाव आहे .  
दाखल तक्रारदार हे एकोडी, ता.जि. गोंदिया येथील रहीवासी असुन शेती व दारु विक्रीचा व्यवसाय करतो. त्याकरीता ते पोलीस स्टेशन गंगाझरी येथील बिट अंमलदार यांना रु. १५०० मासिक हप्ता देत होते. दरम्याणच्या कालावधीत दारु विक्रीचा व्यवसाय मंदावल्यामुळे ते बिट अंमलदार यांना रु. १,५००  ऐवजी रु. १,००० मासिक हप्ता देत होते. माहे जानेवारी २०१९ मध्ये त्यांचेविरूध्द आबकारी विभागाकडुन अवैधरित्या दारू विक्रीची कार्यवाही झाल्यापासुन त्यांनी दारू विक्रीचा व्यवसाय बंद केला होता. तरी सुध्दा बिट अंमलदार देवेंद्र शिवलाल चोपकर, नायक पोलीस षिपाई, ब.न. १३५५ , नेमणुक पोलीस स्टेशन गंगाझरी, जिल्हा गोंदिया यांनी तक्रारदारावर अवैध दारु विक्रीची कार्यवाही न करण्याकरीता तक्रारदाराकडे रु. १५०० मासिक हप्त्याची लाचेची मागणी केली. तक्रारदार यांची देवेंद्र शिवलाल चोपकर यांना लाच देण्याची मुळीच ईच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गोंदिया येथे तक्रार नोंदविली तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीवरून सापळा कार्यवाहीचे आयोजन केले असता सापळा कार्यवाही दरम्यान देवेंद्र शिवलाल चोपकर  यांनी तक्रारदाराच्या अवैध दारु विक्रीची कार्यवाही न करण्याकरीता तक्रारदारास १५०० रू लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याची तयारी दर्शविली . त्यावरून आरोपी विरूध्द दि. १३ मार्च २०१९ रोजी पोलीस स्टेशन गंगाझरी, जि. गोंदिया येथे कलम ७ लाचलुचपत प्रतिबंध (संषोधन) अधिनियम २०१८ अन्वये गुन्हा नोंद करण्यात येत आहे. 
सदर कार्यवाही ला.प्र.वि, नागपुर पोलीस अधिक्षक  श्रीकांत धिवरे , अपर पोलीस अधिक्षक राजेष दु्द्दलवार यांच्या मार्गदर्शनात  पोलीस उपअधिक्षक रमाकांत कोकाटे, पो.हवा. प्रदिप तळु सकर, राजेश  शेंद्रे  ना.पो.शि . रंजित बिसेन, डिगांबर जाधव, नितीन रहांगडाले, राजेद्र  बिसने, वंदना बिसेन, गिता खोब्रागडे, व चालक ना. पो. शि . देवानंद मारबते, सर्व लाप्रवि., गोंदिया यांनी केली आहे. 
   Print


News - Gondia | Posted : 2019-03-13


Related Photos