तांत्रिक अडचणींमुळे गुगलच्या सेवेत अडथळा, जीमेल , यू-ट्यूबच्या सेवाही चालेना


वृत्तसंस्था / नवीदिल्ली :   जगभरातील कोट्यवधी नेटकरांना आज धक्का बसला आहे.   तांत्रिक अडचणींमुळं गुगलच्या सेवेत अडथळा येत आहे. पाठवलेले ई-मेल समोरच्याला मिळत नाहीत. मिळालेच तर डाउनलोड होत नाहीत. त्यामुळं युजर्स हैराण झाले असून सोशल मीडियावर तक्रारींचा पाऊस पडला आहे.  गुगल ड्राइव्ह , जीमेल , यू-ट्यूब सेवाही चालत नसल्याचे दिसून येत आहे. 
  नेटकरांच्या तक्रारींची गुगलनं तातडीनं दखल घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. युजर्सना येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लवकरच सेवा पूर्ववत होईल,' असा खुलासा गुगलनं केला आहे. पहिल्यांदा आपलं नेटवर्क तपासा आणि पुन्हा प्रयत्न करा, असा सल्लाही गुगलनं युजर्सला दिला आहे.   Print


News - World | Posted : 2019-03-13


Related Photos