लग्न समारंभाचे कपडे घेण्यासाठी आणले घरी पैसे , चोरट्यांनी रात्रीच केले लंपास


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
शुभम शेंडे / मुलचेरा :
लग्न समारंभ म्हटले की पैशांची मोठ्या प्रमाणात जुळवाजुळव करावी लागते. मात्र जुळवा जुळव करून आनंदाच्या क्षणांची वाट पाहणाऱ्या एका कुटुंबावर ऐनवेळी चोरट्यांमुळे संकट कोसळले आहे. 
 गोमनी येथील लचमा मेंंगेनवर  यांच्या घरी येत्या २८ मार्च रोजी  मुलाचे  लग्न आहे.  यामुळे काल १२ मार्च रोजी मेंंगेनवर  यांनी  बँकेतून ६० हजार रुपये काढून घरी आणले होते.   या पैशातून आज  लग्न समारंभासाठी कपडे घेण्यासाठी जाणार होते .  मात्र  रात्रीच  अज्ञात चोरट्याने या पैशांवर डल्ला मारला. यामुळे मेंंगेनवर  यांच्यावर आर्थिक संकट कोसळले.  चोरट्याने पैसे लांबविल्याची  बाब मेंंगेनवर  यांना  सकाळी लक्षात आली.  आज सकाळी त्यांच्या मुलीचा पेपर असल्याने तिने  आईकडे बसच्या तिकिटासाठी पैशांची मागणी केली.   तिच्या आई ने जेव्हा पैसे काढण्यासाठी बघितले   तेव्हा पैशांची  ती पेटी गायब असल्याचे आढळले. यानंतर  घरी आरडाओरड सुरू झाली.  बाहेर येऊन बघितले असता  पेटी बाहेर फेकून दिलेली आढळली.   पेटीमध्ये सोने पण होते. मात्र कदाचित चोराच्या लक्षात आले नसावे.  ६० हजारांची संपूर्ण रक्कम घेऊन त्याने पोबारा केला. यामुळे या  गरीब परिवारावर संकट कोसळले आहे.   आता लग्न समारंभ कसा उरकवायचा असा प्रश्न त्यांच्यावर उभा ठाकला आहे .  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-13


Related Photos