महत्वाच्या बातम्या

 आपले सरकार सेवा केंद्राच्या अर्जावर आक्षेप नोंदवावेत


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्ह्यामध्ये महसूल विभागाशी संबंधित सर्व सेवा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. नारिकांना त्यांच्या वास्तव्यास असलेल्या परिसरामध्ये, गावामध्ये सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन निर्णयामधील निकषानुसार १५३ आपले सरकार सेवा केंद्राचे नव्याने वाटप करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले होते. या प्राप्त अर्जावर आक्षेप असल्यास जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागात लेखी आक्षेप नोंदवावेत, असा सूचना जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी दिल्या आहेत.

आपले सरकार सेवा केंद्रासंदर्भात आतापर्यंत १ हजार ४८ अर्ज प्राप्त झाले असून छाननी अंती प्राप्त अर्जाची यादी जिल्हा संकेतस्थळ Nagpur.gov.in  यावर जाहीर करण्यात आलेली आहे.

आपले सरकार सेवा केंद्राकरीता अर्ज केलेल्या अर्जदारांनी या संकेतस्थळाला भेट  देऊन यादी बघता येईल. यामध्ये काही आक्षेप असल्यास ६ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयातील माहिती व तंत्रज्ञान विभागात लेखी आक्षेप नोंदवावेत. यानंतर प्राप्त होणाऱ्या आक्षेपाचा विचार करण्यात येणार नाही.





  Print






News - Nagpur




Related Photos