महत्वाच्या बातम्या

 छत्रपती शाहू महाराज खऱ्या अर्थाने लोकराजा होते : आरसेटी संचालक कैलाश बोलगमवार


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : अवघ्या २८ वर्षाच्या राजकीय कार्यकिर्दीत छत्रपती शाहू महाराजांनी केवळ आणि केवळ जनतेच्या भल्यासाठी, अतिमागास जनतेसाठी कार्य केले. त्यात साहीत्य, क्रिडा, संस्कृती आणि शिक्षण याचाच विचार केला म्हणून खऱ्या अर्थाने छत्रपती शाहू महाराज हे लोकराजा होते, असे गौरवोदार आरसेटी गडचिरोली चे संचालक कैलाश बोलगमवार यांनी काढले. ते ग्रामीण विकास मंत्रालय भारत सरकार द्वारा प्रायोजीत आणि बँक ऑफ इंडिया द्वारा संचालीत बँक ऑफ इंडिया ग्रामीण स्वरोजगार प्रशिक्षण संस्था (आरसेटी) गडचिरोली येथे आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची १४९ व्या जयंती कार्यक्रमा प्रसंगी ते बोलत होते. 

मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून कार्यक्रम समन्वयक हेमंत मेश्राम, पुरुषोतम कुनघाडकर, इलेक्ट्रानिक मोटार रिवाईंडिंग आणि रिपेअरींग प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक हंसराज बोपचे तसेच मत्स्य व्यवसाय प्रशिक्षणाचे तज्ज्ञ मार्गदर्शक पंकज राऊत आणि दोन्ही प्रशिक्षणाचे प्राशिक्षणार्थी उपस्थित होते. 

या प्रसंगी सर्वप्रथम छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला माल्यापण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक पुरुषोत्तम कुनघाडकर यांनी मानले. कार्यक्रमाचे यशस्वी नियोजनासाठी पंकज पाटील आणि अमिन यांचे सहकार्य लाभले. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos