अखेर गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांना स्थगिती, १४ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली  : 
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर स्थानीक गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी - २०१९ च्या परीक्षा तात्पुरत्या स्थगीत केल्याची माहिती गोंडवाना विद्यापीठाने दिली आहे.  या परीक्षा १५ एप्रिलपासून सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विद्यापीठाने दिलेल्या माहितीनुसार  गोंडवाना विद्यापीठांंतर्गत  १ लाख ६ हजार ४३७ विद्यार्थ्यांकरिता उन्हाळी २०१९ च्या परीक्षा ८ एप्रिल २०१९ पासुन सुरू करण्याचे नियोजित करण्यात आले होते. मात्र लोकसभा निवडणुक २०१९ च्या  मतदानाचे वेळापत्रक घोषित झाले असुन त्यानुसार ११ एप्रिल २०१९ रोजी गडचिरोली  - चिमुर व चंद्रपुर या लोकसभा मतदार संघामध्ये मतदान होणार आहे. विद्यार्थी व प्राध्यापक यांना सोईचे व्हावे याकरिता गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी २०१९ चे वेळापत्रक सद्यस्थितीत स्थगित करण्यात आले आहे. परिक्षेचे सुधारित वेळापत्रक लवकरच घोषित करण्यात येईल. याबाबत गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील सर्व प्राचार्य तथा संबंधित सर्व विद्यार्थ्याना अधिसुचनेव्दारे कळविण्यात आले आहे असेही गोंडवाना विद्यापीठाचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे  संचालक डॉ. अनिल चिताडे यांनी कळविले आहे. 



  Print






News - Gadchiroli | Posted : 2019-03-12






Related Photos