१६ ते २२ मार्च दरम्यान जलजागृती सप्ताहाचे आयेाजन : जिल्हाधिकारी यांचे हस्ते उद्घाटन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा : 
दरवर्षी जलसंपदा विभागाच्या वतीने जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी १६ ते २२ मार्च या कालावधित जलजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. सप्ताहाचे उद्घाटन १६ मार्च रोजी सकाळी १० वाजता विकास भवन येथे जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांचे हस्ते जिल्हयातील वर्धा, धाम,बोर, पोथरा, व पंचधारा या पाच नदयाच्या जल पुजन व जलप्रतिज्ञेचे वाचन करुन होणार आहे.
नागरिकांनी या जलजागृती सप्ताहाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन निम्न वर्धा कालवे विभागाचे कार्यकारी अभियंता दि.ग. बारापात्रे यांनी केले आहे. सप्ताहा दरम्यान २० मार्च रोजी सकाळी ८  वाजता जिल्हा क्रिडा संकुल येथून जलदौड आयोजित करण्यात आली आहे. तसेच दि. १७ ते २१ मार्च दरम्यान लाभक्षेत्रातील प्रत्येक गावात एक कार्यशाळा, चर्चा व सभा घेण्यात येणार असून यामध्ये पाणी उपलब्धता, सिंचनाच्या पध्दती, पिकांना लागणारे पाणी बचत, सिंचनाचे फायदे, नियम पाणी वापर संस्थाची माहिती, आवश्यकता व फायदे , तालुक्यातील सिंचन प्रश्न अपुर्ण प्रकल्पाच्या बांधकामाचे नियोजन, उपसा सिंचन पाणी परवाने इत्यादी विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. २२ मार्च रोजी सकाळी १० वाजता जिल्हाधिकारी यांचे उपस्थित विकास भवन येथे जलजागृती सप्ताहाचा समारोप करण्यात येणार आहे. नागरिकांनी या सप्ताहाला उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे.

   Print


News - Wardha | Posted : 2019-03-12


Related Photos