महत्वाच्या बातम्या

 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्ताव आमंत्रित


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / भंडारा : महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या महिला व संस्थाकडून सन 2020-21, 2021-22, 2022-23 व 2023-24 करीता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कारासाठी प्रस्तावाची मागणी करण्यात आली आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार, विभागीय पुरस्कार व जिल्हास्तरीय पुरस्कार असे तीन पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पुरस्कारामध्ये महिला व बाल विकास क्षेत्रात उल्लेखनिय कामाचा 25 वर्षांचा सामाजिक कार्याचा अनुभव असावा. ज्या महिलांना जिल्हास्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार, दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या महिला तो पुरस्कार मिळण्याच्या 5 वर्षापर्यत राज्यस्तरीय पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही. चारित्र चांगले असल्याबाबत व त्यांचे विरूध्द कोणताही फौजदारी तसेच सार्वजनीक संपत्तीचा अपहार न केल्याबाबतचे विभागीय पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र जोडावे.

विभागीय पुरस्कारामध्ये महिला व बाल ‍विकास क्षेत्रात संस्थेचे किमान 10 वर्ष कार्य असावे. संस्था नोंदणीकृत असावी, संस्थेस दलित मित्र पुरस्कार प्राप्त नसावा. संस्था राजकारणापासुन अलिप्त असावी. तीचे कार्य व सेवा ही पक्षातील व राजकारणापासुन अलिप्त असावी. संस्थेच्या सर्व सदस्यांचा ठराव जोडावा. संस्थेचे पदाधिकारी यांचे चारित्र प्रमाणपत्र व संस्थेनी सार्वजनिक संपत्तीचा अपहार केला नसल्या बाबतचे विभागीय पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र जोडावे.

जिल्हास्तरीय पुरस्कारामध्ये महिला व बाल विकास क्षेत्रात किमान 10 वर्ष सामाजिक कार्य असावे. ज्या महिलांना दलित मित्र पुरस्कार अथवा सावित्रीबाई फुले पुरस्कार प्राप्त झालेला आहे त्या महिलांना हा जिल्हास्तरीय पुरस्कार देता येणार नाही. चारित्र चांगले असल्याबाबत व त्यांचे विरूध्द कोणताही फौजदारी तसेच सार्वजनीक संपत्तीचा अपहार न केल्याबाबतचे विभागीय पोलीस अधीक्षक यांचे प्रमाणपत्र जोडावे.

वरील पुरस्काराकरीता इच्छुक व्यक्ती (महिला) किंवा संस्थांनी विहित नमुन्यातील अर्ज 5 जुलै 2023 पर्यंत जिल्हा महिला व बाल विकास कार्यालय पहिला माळा, भुविकास बँक, शिवाजी क्रिडा स्टेडीयम समोर, भंडारा येथे सादर करावे. असे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी तुषार पौनिकर यांनी केले आहे.  






  Print






News - Bhandara




Related Photos