जयहिंद फाउंडेशन वर्धा तर्फे शहिद प्रेमदास मेंढे यांना श्रद्धांजली


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा  :
नाचनगाव (पुलगाव) येथे जयहिंद फाउंडेशन , महाराष्ट्र राज्य शाखा वर्धा तर्फे ११ मार्च रोजी शहिद प्रेमदास मेंढे यांच्या द्वितीय शहिद दिनानिमित्य श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 
 सदर कार्यक्रमाच्या माध्यमातून शाहिद प्रेमदास मेंढे यांना श्रद्धांजली देण्यात आली. व कस्तुरबा गांधी रुग्णालय च्या चमू मार्फत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते . तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी निवृत्त डॉ. मेजर शिल्पा खरबकर यांच्या हस्ते सैन्यांतून सेवा पूर्ण करून आलेले सैनिक नायक आशिष सावरकर, नायक पंकज घनमोडे, नायक राजकुमार कैकाडी,  नायक  संदिप कोहळे , नायक निलेश खरोडकर या सेवानिवृत्त  सैनिकांचा सत्कार करण्यात आला .तसेच १० व्या वर्गात गुणवत्ता प्राप्त विद्यार्थीनी कुमारी खुशी ओरके हीचा तसेच CRPF बटालियन मधून सेवा निवृत्त  प्रवीण पलांडे यांचाही सत्कार करण्यात आला.
 कार्यक्रमाचे संचालन जयहिंद फाउंडेशन चे उपाध्यक्ष   प्रवीण पेठे यांनी केले. तसेच प्रास्ताविक जयहिंद फाउंडेशन चे वर्धा शाखेचे अध्यक्ष बिपीन मोघे यांनी केले व जयहिंद फाउंडेशन चे उद्देश आणि आजपर्यंत केलेल्या कार्याची आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या कार्या  बद्दल माहिती दिली.  तसेच जयहिंद  फाउंडेशन नेहमी शहिद परिवाराच्या, माजीसैनिक, आजीसैनिक, CRPF, BSF, तसेच इतर अर्ध सैनिक बल यांच्या सोबत नेहमी उभी राहून कार्य तत्परतेने कार्य करीत राहील अशी हमी दिली.
 सदर कार्यक्रमात उपस्थित IESL वर्धा चे अध्यक्ष श्याम परसोडकर, IESL तालुका हिंगणघाट चे अध्यक्ष  पुंडलिक बकाने, पंचायत समिती आर्वी च्या सदस्या माजीसैनिक सैनिक राजेश सावरकर यांच्या पत्नी  सावरकर, आणि विरपत्नी हर्षदा प्रेमदास मेंढे  यांनी आपले मनोगत मांडले. व शेवटी जयहिंद फाउंडेशन चे सचिव संजय उराडे यांनी आभार प्रदर्शन करून शेवटी सर्व शहीद वीरांना श्रद्धांजली दिली व राष्ट्रगीताने स्नेह भोजना सह कार्यक्रमाला विराम देण्यात आला.
  या कार्यक्रमात विशेषता माजीसैनिक, महिला बचत गटातील महिला उपस्थित होत्या, IESL वर्धा चे सर्व सदस्य, IESL हिंगणघाट च्या महिला, तसेच पुरुष वर्ग, जिल्हा सैनिक कार्यालयातील कर्मचारी वर्ग, तथा जयहिंद फाउंडेशन चे सदस्य रवी आडे,  सारंग भोयर, विकास विद्यालय गांधी नगर वर्धा च्या शिक्षिका कुमारी वंदना उभाड, कुमारी कविता शीलनकर  आणि पुलगाव नाचनगाव येथील रहिवासी मोठ्या प्रमाणात सहभागी होते.  Print


News - Wardha | Posted : 2019-03-12


Related Photos