गडचिरोली शहरास अवकाळी पावसाचा फटका, नागरिकांची तारांबळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली : शहरास आज ११ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अवकाळी पावसाने तडाखा दिला. दिवसभर वातावरण सामान्य होते. सायंकाळीही पावसाची कोणतीही लक्षणे नव्हती. मात्र रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास अचानक अवकाळी पावसास प्रारंभ झाला. यामुळे नागरीकांची पळापळ सुरू झाली. या अवकाळी पावसाचा रात्रीच्यावेळी आयोजित स्वागत समारंभ व अन्य कार्यक्रमांना फटका बसला.
News - Gadchiroli | Posted : 2019-03-11