गडचिरोलीसह देशातील नक्षलग्रस्त भागातील निवडणूका पहिल्या टप्प्यातच : पोलिस अधीक्षक बलकवडे


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी /  गडचिरोली  : 
 नक्षलग्रस्त भागात निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्याचे प्रशासनासमोर मोठे आव्हान असते. निवडणूक काळात नक्षली घातपाती कारवाया घडवून आणतात. हे लक्षात घेऊन निवडणूक आयोगाने देशातील नक्षलग्रस्त भागात पहिल्या टप्प्यातच निवडणूक घेण्याचा कार्यक्रम आखला आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली.
 गडचिरोली जिल्हा नक्षलग्रस्त असून निवडणूका यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी पोलीस यंत्रणा सक्षम आहे. जिल्हयात यापुर्वी  निवडणूक काळात नक्षली घटना घडून आल्या आहेत. याची खबरदारी घेत पोलीस यंत्रणा अधिक  दक्ष राहणार असून निवडणूकीत दुर्गम भागातील मतदारांचा सहभाग वाढावा, यासाठी संपुर्ण यंत्रणा कामी लागली आहे. दुर्गम भागातील मतदारांपर्यत पोहचण्यात येणार आहे.
गडचिरोलीसह  आंधप्रदेश, छत्तीसगड, आडीसा व इतर नक्षलग्रस्त राज्यातील भागात पहिल्या टप्प्यातच लोकसभेची निवडणूक होणार आहे. यामुळे निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्याबरोबच पोलीस यंत्रणेवरचा ताण कमी होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात ८० च्या आसपास संवेदनशिल व अतिसंवेदनशिल मतदान केंद्र होते. आता मात्र ३३ केंद्रांची संख्या कमी झाली आहे. दुर्गम भागात निवडणूक प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तत्पर असल्याची माहिती पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकार परिषदेतून दिली.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-11


Related Photos