महत्वाच्या बातम्या

 ड्रोन स्प्रेयिंग उपकरणासाठी अनुदान : अर्ज करण्याचे आवाहन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : जिल्हा नियोजन वार्षिक निधी अंतर्गत नावीन्यपूर्ण बाब या घटकामध्ये ड्रोन स्प्रेयिंग उपकरण ९० टक्के अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठीचे अर्ज कृषी कार्यालयास ३० जूनपर्यंत सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी अपेक्षित खर्च रक्कम दोनशे बारा लाख रुपये निधीस मंजुरी प्रदान केलेली आहे. या निधीचा लाभ घेण्यासाठी शेतकरी उत्पादन कंपनी यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांना संपर्क साधून अर्जाचा नमुना उपलब्ध करून घ्यावा. अर्ज परिपूर्ण भरून त्यासोबत शेतकरी उत्पादन कंपनी किंवा संस्था यांचे नोंदणी प्रमाणपत्र, पॅन कार्ड, कंपनीचे अध्यक्ष किंवा सचिव यांचे आधार कार्ड, बँक पासबुकाची छायांकित प्रत, रद्द केलेला चेक, कंपनीचा ठराव, कंपनीचे लेटरहेड, ड्रोन ऑपरेटर चे संपूर्ण नाव, मोबाईल क्रमांक, पारपत्र, इयत्ता दहावीची मार्कशीट, ड्रोनचे प्रमाणपत्र व कोटेशन, आरपीटीओ प्रशिक्षण झाले असल्यास प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. प्राप्त अर्जाची छाननी होऊन ज्यांनी कृषी विभागाच्या या योजनेचा लाभ घेतलेला नाही, अशा पात्र शेतकरी उत्पादक कंपन्यांना ९० टक्के अनुदानाचा लाभ देण्यात येणार आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos