वैरागड येथे उन्हाळी धान पिकात निंदन करीत असताना सर्पदंशाने महिलेचा मृत्यू


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

तालुका प्रतिनिधी / आरमोरी : तालुक्यातील वैरागड येथे स्वतःच्या शेतामध्ये उन्हाळी धान पिकातील निंदन करीत असलेल्या महिलेचा सर्पदंशाने  मृत्यू झल्याची घटना आज ११ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.
अर्चना नरेंद्र बावनकर (३२) असे मृतक महिलेचे नाव आहे. अर्चना बानवकर ही महिला रोजच्याप्रमाणे कुटुंबीयांसोबत स्वतःच्या शेतातील धान पिकात निंदन करीत होती. दुपारच्या सुमारास अचानक विषारी सापाने दंश केला.  यानंतर तिला आरमोरी येथील ग्रामीण रूग्णालयात भरती करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झला.  मृतक अर्चना च्या पश्चात एक मुलगा, एक मुलगी, पती, सासू, सासरे व बराच मोठा आप्तपरिवार आहे. बावनकर कुटुंबीयांची आर्थिक परिस्थिती बेताची असून आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-11


Related Photos