महत्वाच्या बातम्या

 योग साधनेमुळे मानवाला उत्तम आरोग्य प्राप्त होते : न्या. ए.एन. करमरकर


- विधी सेवा प्राधिकरण येथे योग दिन साजरा

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : आरोग्य हा मानवी जीवनातील महत्वाचा घटक असून उत्तम आरोग्य हे प्रत्येकाचे लक्ष बनले आहे. हे उत्तम आरोग्य मानवाला योग साधनेमुळे प्राप्त होते, असे प्रतिपादन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एन. करमरकर यांनी योग दिन कार्यक्रमात केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्यावतीने जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात जागतिक योग दिनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हा न्यायाधिश-१ एन.बी. शिंदे, योग प्रशिक्षक प्रा.सलीम शेख, योग प्रशिक्षिका श्रीदा वालवडकर-काणे, अधिवक्ता संघाचे अध्यक्ष के.पी. लोहवे आदी उपस्थित होते.

२१ जून हा दिवस वर्षातील सर्वात लांब दिवस असून हा दिवस मनुष्याचे दिर्घ आयुष्य दर्शविणारा आहे. अशा या योग दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाच्या सामान्य किमान कार्यक्रम नुसार तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए.एन. करमरकर यांच्या मार्गदर्शनाखाली योग शिबिराचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमाचे संचलन व आभार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव विवेक देशमुख यांनी मानले. कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विधी स्वयंसेवक, कायद्याचे शिक्षण घेणारे विद्यार्थी, न्यायालयीन कर्मचारी यांनी योग करुन निरोगी राहण्याचा निश्चय व संकल्प केला.





  Print






News - Wardha




Related Photos