महत्वाच्या बातम्या

 राष्ट्रपतींच्या दौऱ्याचे विभागांनी सुक्ष्म नियोजन करावे : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले


- जिल्हाधिकाऱ्यांच्या विभागांना सुचना

-  दौऱ्याच्या अनुषंगाने आढावा बैठक

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / वर्धा : देशाच्या राष्ट्रपती महामहिम द्रौपदी मुर्मू यांचा 6 जुलै रोजी वर्धा जिल्हा दौरा कार्यक्रम आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व संबंधित विभागांकडून तयारीचा आढावा घेतला. विभागांनी दौऱ्याची तयारी करतांना सोपविलेल्या कामांचे सुक्ष्म नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

बैठकीला जिल्हाधिकाऱ्यांसह सहाय्यक जिल्हाधिकारी विनायक महामुनी, अतिरिक्त जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, अप्पर पोलिस अधीक्षक सागर कवळे, निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी सोपान कासार, प्रियांका पवार, अंजली मोरड, उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी शेख समीर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल भोसले, शशिकांत शिंदे, जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी नितीन चौधरी, कार्यकारी अभियंता महेश माथुलकर, उपअभियंता महेश मोकलकर, पोलिस निरिक्षक संजय गायकवाड यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महामहिम राष्ट्रपती येथे कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या दौऱ्याच्या अनुषंगाने विविध बाबींचा विभागनिहाय आढावा घेतला. राष्ट्रपतींचा वर्धा शहरातील प्रवासाचा मार्ग, मार्गावरील सुरक्षा, हेलीपॅड निर्मिती, वाहतूक, स्टेज, निवास, स्वागत, वैद्यकीय पथक, सुरक्षा पासेस, राष्ट्रपतींच्या आगमनानिमित्त शहराची स्वच्छता, कार्यक्रमस्थळी इंटरनेट सुविधा, बैठक व्यवस्था आदींचे नियोजन विभागांकडून जाणून घेतले. राष्ट्रपतींचा जिल्ह्यातील दौरा सुयोग्य प्रकारे पार पडण्यासाठी विभागांनी सुक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला महसूल, पोलिस, आरोग्य, परिवहन, अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पुरवठा विभाग, वीज वितरण कंपनी, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, राष्ट्रीय विज्ञान केंद्र, नगर पालिका प्रशासन, हिंदी विश्वविद्यालय आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


जिल्हाधिकाऱ्यांकडून स्थळांची पाहणी : 

राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसह स्थळांची पाहणी केली. सेवाग्राम येथील हेलीपॅड, राष्ट्रपतींचा हेलीपॅड ते कार्यक्रम स्थळ प्रवासाचा मार्ग, विद्यापिठातील कार्यक्रम स्थळ, सभागृह. तेथील सुरक्षा व बैठक व्यवस्था तसेच अन्य बाबींची पाहणी केली.





  Print






News - Wardha




Related Photos