पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाच्या जवानांनी केला तीन दहशतवाद्यांचा खात्मा


वृत्तसंस्था / श्रीनगर  : दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचा जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन राबवलं. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.
संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पिंगलिश भागात सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. त्यानंतर रात्रभर चाललेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुद्दसिर अहमद खान (२३) याचाही खात्मा करण्यात यश आलं आहे. मुद्दसिरनं पुलवामा हल्ल्यादरम्यान गाडी आणि विस्फोटांचा पुरवठा केला होता. मुद्दसिरनं पुलवामातून ग्रॅज्युएशन आणि इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमाही केला आहे. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, मुदसिर हा पदवीधर असून त्याने आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन व स्फोटके मिळवून दिली होती. त्राल येथील मिर मोहल्ला येथे राहणारा मुदसिरने दोन वर्षांपूर्वी जैश-ए-मोहम्मदसाठी भूमिगत राहून काम करत होता. त्यानंतर त्या संघटनेच्या नूर मोहम्मद तंत्री या दहशतवाद्याच्या गटात तो सक्रिय झाला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया घडविण्यात नूरचा मोठा हात होता.  



  Print






News - World | Posted : 2019-03-11






Related Photos