ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात नक्षल्यांनी केली गडचिरोली नगर परिषदेच्या शाळेतील कंत्राटी कला शिक्षकाची गोळ्या झाडून हत्या


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
   सशस्त्र नक्षलवाद्यांनी तालुक्यातील कोटगुल पोलिस मदत केंद्रांतर्गत ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात एका कंत्राटी आरोग्य सेविकेच्या पतीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना आज १० मार्च रोजी  संध्याकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास घडली .  योगेंद्र मेश्राम,रा.बोटेझरी असे मृत इसमाचे नाव आहे. ते गडचिरोली नगर परिषदेच्या जवाहरलाल नेहरु विद्यालयात कलाशिक्षक म्हणून कार्यरत होते.
योगेंद्र मेश्राम  हे  दर शनिवारी  बोटेझरी येथील कंत्राटी आरोग्य सेविका म्हणून कार्यरत असलेली पत्नी  कस्तुरबा चंदू देवगडे हिच्याकडे जात होते.  दरम्यान आज ढोलडोंगरी येथील कोंबडा बाजारात ते गेले होते. ही संधी साधून नक्षलवाद्यांनी त्यांनी गोळ्या झाडून हत्या केली.   गोळ्या झाडल्यानंतर योगेंद्र मेश्राम यांना कोटगूल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. मात्र, उपचाराआधीच त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय  अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.  याबाबत कोटगुल पोलिस मदत केंद्रात घटनेची नोंद करण्यात आली आहे.   उपविभागीय पोलिस अधिकारी शैलेश काळे घटनेचा तपास करीत आहेत.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-10


Related Photos