मार्कंडादेव यात्रेदरम्यान भाविकांनी दिले २ लाख ८४ हजारांचे दान


- मागील वर्षी मिळाले होते २ लाख ५८ हजारांचे दान
 प्रतिनिधी / गडचिरोली  :
  विदर्भाची काशी म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या चामोर्शी  तालुक्यातील मार्कंडादेव येथे महाशिवरात्रीनिमित्त  लाखो भाविकांनी मार्कंडेश्वराचे दर्शन घेतले. भाविकांनी  यावर्षी २  लाख ८४ हजार रूपये मार्कंडेश्वराच्या चरणी दान केले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी २ लाख ५८ हजार रूपये दानाच्या स्वरूपात प्राप्त झाले होते. 
४ मार्चपासुन  मार्कंडादेव  येथे यात्रेला प्रारंभ झाला. यात्रा संपल्यानंतर  मार्कंडेश्वर  देवस्थान ट्रस्ट व प्रशासनाच्यावतीने भाविकांनी व शिव भक्तांनी मार्कंडेश्वराच्या  चरणी घातलेल्या गुप्तदानाची मोजणी मार्कंडेश्वर  देवस्थान कार्यालय सभागृहात करण्यात आली. प्राप्त दानाची  मोजणी केल्यानंतर २ लाख ८४ हजार रूपयांची रक्कम गोळा झाली. 
यावर्षी पावती स्वरुपात मार्कंडेश्वर  देवस्थानाला ६२ हजार ७०० रुपये देणगी प्राप्त झाली. २०१८ मध्ये महाशिवरात्री यात्रेदरम्यान मार्वंâडेश्वराच्या चरणी २ लाख ५८ हजार ४०० रुपये गुप्त दान प्राप्त झाले होते.  यावेळी  मार्कंडेश्वर  देवस्थानचे अध्यक्ष गजानन भांडेकर, सचिव मृत्युजंय गायकवाड , सहसचिव रामुजी तिवाडे, मंडळ अधिकारी टि.डी. फुलझेले , तलाठी एस.जी. भरडकर, जयराम चलाख, भैय्याजी चलाख, व्यवस्थापक जनार्धन जुनघरे, चंदु गेडाम, प्रभाकर गेडाम, पुरुषोत्तम शेंडे, पोलीस कर्मचारी व नागरीक उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-10


Related Photos