सत्तरी गाठणाऱ्या ७० मातांचा सत्कार करून पवार महिला समितीने साजरा केला आंतराष्ट्रीय महिला दिवस


- पुलवामा आतंकी हल्यातील शहिदांना श्रध्दांजली
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनीधी / गोंदिया :
पुलवामा येथील आतंकी हल्यातील शहीदांना श्रध्दांजली तसेच समाजातील सत्तरी गाठणाऱ्या  ७० मातांचा सत्कार करून पवार महिला समितीने ८  मार्चला आंतराष्ट्रीय महिला दिवस साजरा केला. पवार प्रगतशील मंचच्या तत्वाधानात गठित करण्यात आलेल्या पवार महिला समितीच्या वतीने कन्हारटोली येथील पवार सांस्कृतिक भवनात आयोजित या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून मध्यवर्ती कारागृह नागपूर येथील प्रथम महिला कारागृह अधिकारी सरिता बघेले, कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून पोवार समाजातील प्रथम महिला डाॅक्टर बालाघाट येथील मिताली नर्सिंग होमच्या संचालिका डाॅ.रागीनी पारधी उपस्थित होत्या.
या प्रसंगी सत्कार मुर्ती म्हणून वरिष्ठ समाज सेविका शांताबाई रहांगडाले, प्रमुख अतिथी म्हणून पं.स.गोंदियाच्या सभापती माधुरी हरिणखेडे, उपमा चौहान ,संध्याराणी बिसेन,एकता चैहान, विणा बिसेन व विशेष अतिथी म्हणून सेवानिवृत्त प्राचार्य शारदा पटले, सेवानिवृत्त प्राध्यापिका मिरा पटले सह समाजातील सत्तरी पार करणाऱ्या ७० माता उपस्थित होत्या.
समाजाचे कुलदैवत चक्रवर्ती राजाभोज व माता गढकालिका,प्रथम महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली तसेच पुलवामा आतंकी हल्यात शहीद झालेल्या शहिदांना श्रध्दांजली अर्पित करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना कार्यक्रमाच्या उद्घाटिका सरिता बघेले यांनी महिलांना संघटीत होवून समाजात उच्च पदावर जावून नेतृत्व करण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षा डाॅ.रागिणी पारधी यांनी  पोवार समाजाची विशेषता सांगतांना म्हटले की, पोवार समाजात मुलगा व मुलगी मध्ये भेदे केला जात नाही त्यामुळेच मी उच्च शिक्षण घेवू शकली. पोवार समाजात मुलगा व मुलगी मध्ये भेद केला नाही त्यामुळेच मी उच्च शिक्षण घेवू शकली. पोवार समाजात महिलांचे सन्मान व विशिष्ट दर्जा नेहमी कायम ठेवला जातो ही समाजासाठी गौरवाची बाब आहे. कार्यक्रमाची प्रस्तावना पवार महिला समितीच्या अध्यक्षा अंजली ठाकुर यांनी मांडली. याप्रसंगी सत्कारमुर्ती शांताबाई रहांगडाले याचा शाल,श्रीफळ,स्मृती चिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच प्रमुख अतिथींच्या हस्ते कार्यक्रमाला उपस्थितीत व वयाची सत्तर वर्ष पुर्ण करणाऱ्या ७० मातांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे सुमारे तीन तास चाललेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांनी त्यांच्या कलागुणांच प्रदर्शन केले. या कार्यक्रमात गोंदिया,बालाघाट तसेच सुर्याटोला,कुडवा,छोटा गोंदिया,फुलचुर,मुर्री,सावरटोली,कंटगी येथील समाज महिला भगिनी मिळुन सुमारे २००० महिलांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे संचालन उर्मिला रहांगडाले,स्नेहा गौतम,सिताबाई रहांगडाले यांनी तर आभार जि.प. सदस्या खुशबु टेंभरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी महिला समितीच्या अध्यक्षा अंतली ठाकुर,उपाध्यक्ष सोनु रहांगडाले, सचिव कविता रहांगडाले,कोषाध्यक्ष उर्मिला पारधी,सहसचिव गिता चैधरी, प्रचार सचिव शेफाली बिसेन,संघटन सचिव उषा राणे,सर्व प्रभाग सदस्य मनोनित सदस्य यांनी परिश्रम घेतले.    Print


News - Gondia | Posted : 2019-03-10


Related Photos