महत्वाच्या बातम्या

 पार्टीचे आमीष दाखवून अल्पवयीन मुलीचा विनयभंग : आरोपी शिक्षकास अटक 


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : टास्क दिल्यानंतर ते पूर्ण केलेल्या एका १६ वर्षाच्या मुलीला पार्टी देण्याचे आमीष दाखवून शिकवणी वर्गाच्या शिक्षकाने एका हॉटेलमध्ये नेत तिचा विनयभंग केला. आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून यशोधरानगर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

माहितीनुसार अजयकुमार गंगाराम प्रसाद (३२) रा. छावणी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने टयूशन क्लासेसच्या मुला-मुलींना शनिवारी २४ जूनला दुपारी ३.३० वाजता एका वॉटर पार्कमध्ये नेले. तेथे आरोपीने त्यांना काही टास्क दिले. मुलांनी ते टास्क पूर्ण केले होते. सदर ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या ३८ वर्षाच्या फिर्यादी यांच्या १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीनेही टास्क पूर्ण केले. दरम्यान आरोपी शिक्षकाने या अल्पवयीन मुलीला पार्टी देण्याचे आमीष दाखवून यशोधरानगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ममता मॉलजवळील एका हॉटेलमध्ये नेले. तेथे आरोपीने तिच्याशी अश्लील वर्तन केले. तिच्या मनाला लज्जा वाटेल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. 

सदर प्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून यशोधरानगर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक योगेश महाजन यांनी आरोपीविरुद्ध कलम ३६३, ३५४ (अ), ३५४ (ड) सहकलम ८, १२ नुसार गुन्हा दाखल करून आरोपी शिक्षक अजयकुमारला अटक केली आहे.





  Print






News - Nagpur




Related Photos