महत्वाच्या बातम्या

 जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणाऱ्या आरोपीविरूद्ध गुन्हे नोंद : स्थानिक गुन्हे शाखेची ०४ ठिकाणी कार्यवाही


- एकूण १५ लाख १० हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त

विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीण येथील पथकाने २४ जून २०२३ रोजी अवैधरीत्या जनावराची वाहतुक करणाऱ्यांवर पोलीस स्टेशन मौदा, रामटेक, कन्हान खालीलप्रमाणे कारवाई केली आहे. 

पोलिस ठाणे मौदा हद्दीतून वडोदा शिवार येथे पिकअप योद्धा क्र. MH - ३० / BD ३९९६ या वाहनाने बेकायदेशीरपणे गोवंश यांना त्यांची चारा पाण्याची सोय न करता गाडी मध्ये कोंबून कत्तलीकरीता भंडारा येथून नागपूर कडे जात आहे. अशा मिळालेल्या माहिती वरून वडोदा शिवार येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने नाकाबंदी करून त्याला थांबविण्याचा इशारा दिला असता न थांबता घटनास्थळाहून पळून गेला. यावर सदर गाडीचा पाठलाग केला असता सदर वाहन हे आरोपी रोडचे बाजूला उभे करून पळून गेले. सदर वाहनाची पाहणी केली असता त्यात १३ गोवंश किंमती अंदाजे ०१ लाख ३० हजार रू. १) टाटा योध्दा वाहन क्र. MH - ३० / BD ३९९६ किमती अंदाजे ५ लाख रु. असा एकूण ६ लाख ३० हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तसेच माथनी शिवारात काही गोवंश यांना झाडी झुडपात चारा पाण्याची काहीही व्यवस्था न करता कत्तल करण्याचे इराद्याने बांधून ठेवले आढळुन आले. तेथुन २० गोवंश जनावरे एकुण किमती ०२ लाख रू. ताब्यात घेवुन गौशाळा जवाहर नगर येथे दाखल करण्यात आले.

भंडारा येथून नागपुर करीता कन्हान मार्गे एका पांढरे रंगाचे टाटा योद्धा मालवाहू क्र. MH36 AA७५२४ ची पाहणी पथकाने केली असता वाहनाचे डाल्याची पाहणी केली असता गायी, गोऱ्हे व कालवट असे एकुण १४ गौवश जनावरांची चारही पाय व तोड निर्दयतेने दोरीने बांधून त्यांना खाली पाडून गुदमरलेल्या स्थितीत दाटी वाटीने तसेच त्यांची कोणतीही चारा पाण्याची व्यवस्था न करता कत्तली करीता घेऊन जात असल्याचे दिसून आल्याने मिळून आलेला आरोपी, वाहन चालक व मालक यांचे विरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागण्यास प्रतिबंधक अधिनियम व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम सहकलम १०९ भादवी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे आरोपीच्या ताब्यातून १) १४ नग गौवंश जनावरे किंमती अंदाजे १ लाख ४० हजार रु. २) टाटा योद्धा मालवाहू क्र. MH36 AA७५२४ किंमती अंदाजे ५ लाख रू. दोन मोबाईल संच किमती अंदाजे १५ हजार रू. असा एकुण ६ लाख ५५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

रामटेक कन्हान मार्ग नागपूर कडे पांढऱ्या रंगाचा टाटा योद्धा मालवाहू वाहन क्र. एम. एच-३६ / एए-२७२४ मध्ये काही इसम अवैधरीत्या कत्तलीकरीता गोवंश घेवुन जाणार आहे. अशा माहिती वरून नमुद पंचाना त्यांना त्याबाबतची माहित सांगुन तारसा फाटा कन्हान येथे नाकाबंदी दरम्यान मिळालेल्या माहिती प्रमाणे पंच व स्टाफ असे मिळुन नाकाकबंदी करीत असता पहाटे ०४.०० वा. सुमारास वरील वाहन आमचेकडे येतांना दिसताच त्या वाहनाचे चालकास थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने काही अंतर अगोदरच वाहन थांबवुन अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेला त्याचा पाठलाग केला असता मिळुन आला नाही. परंतु वाहनाचे कॅबिनमध्ये एक इसम मिळुन आला. त्याचे नाव विचारले असता सय्यद आफरान वल्द सय्यद नुर अली (२०) रा. सैलाब नगर कामठी असे सांगितले. सदर वाहनातील डाल्याची पाहणी केली असता वाहनात १४ नग गोवंश जनावरे निर्दयतेने कोंबुन मिळुन आले. सदर वाहन

चालकाने गोवंश यांना दाटीवाटीने भरून त्यांचे चारा पाण्याचे व्यवस्था न करता दोरीने अतिशय निर्दयतेने बांधुन मिळुन आल्याने त्याचे ताब्यातुन पांढऱ्या रंगाचा टाटा योद्धा किमती ५ लाख रू. ०२ नग गायी किमी २० हजार रु. ०५ नग गोन्हे ५० हजार रू. ०७ नग गोवंश कालवड किमती ७० हजार रु. व साहित्या असा एकुण ०६ लाख ५५ हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

सदरची कार्यवाही नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विशाल आनंद, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदिप पखाले यांच्या आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक अनिल राऊत, आशिष सिंग ठाकूर, पोलीस हवालदार विनोद काळे, ईकबाल शेख, मयूर ढेकले पोलीस नायक वीरू नरड, रोहन डाखोरे, अमृत किंनगे, उमेश फुलबेल, आशीष मुंगले, किशोर वानखेडे पोलीस शिपाई अभिषेक देशमुख यांचे पथकाने पार पाडली.





  Print






News - Nagpur




Related Photos