९ गावातील महिलांनी एकत्र येऊन केला महिला दिन साजरा


-महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान आणि महिंद्रा प्रेरणा प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने आयोजन 
-२५० महिलांची महिंद्राच्या आरोग्य मोबाईल व्हॅन मार्फत मोफत तपासणी  
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / वर्धा  :
महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान आणि महिंद्रा प्रेरणा प्रकल्पाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने तळेगाव (रघुजी) येथे महिला दिन साजरा करण्यात आला. 
महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान आर्वी तालुक्यातील ९ ग्रामपंचायत मध्ये काम करते.  त्यामध्ये परसोडी, सालदरा, हिवरा (तांड) ,बेल्हारा, वडगांव (पांडे) बोधड , पिंपळगांव(भोसले), काचनूर या ग्रामपंचायत मधील गावातून प्रत्येकी १२ महिला या महिला दिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. यामध्ये महिंद्रा प्रेरणा प्रकल्पातील महिला शेतक-यांची संख्या लक्षणीय होती.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणुन लाभलेल्या पोषण व आहार तज्ञ डॉ. विनिता मौनंदेयांनी महिलांना सुदृढ आहार, परसबाग,पोषण मूल्य याबद्दल मार्गदर्शन केले. डॉ.विनिता मेहता (हेल्थ हायजीन तज्ञ) यांनी महिलांची वयक्तिक स्वछता व पोषण आहार याबद्दल उत्तम अशे मार्गदर्शन केले. पर्यवेक्षिका  ललिता आसटकर यांनी महिला दिनाविषयी उत्तम अशे मार्गदर्शन महिलांना केले. ज्योती ठाकरे ( तालुका समनव्यक, पाणी फौंडेशन,आर्वी) यांनी 
महिलांना जल संधारण व जल हैं तो कल हैं याबाबद्दल देखील मार्गदर्शन केले. फटींग (उपमुख्य कार्यकारी अधिकारी , नगर परिषद ,आर्वी) यांनी देखील महिलांना उत्तम असे माझे मतदान माझा अधिकार याबद्दल मार्गदर्शन केले. महिलांनी ग्रामसामाजीक परिवर्तन अभियान अंतर्गत झालेले अमूल्य बदल व त्यांच्या गावातील परिवर्तन याबाबद्दल महिलांनी मनोगत व्यक्त केले.  मालू ठाकरे, अर्चना लांडगे, रूपाली जाधव यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र ग्रामसामाजिक परिवर्तन अभियान जिल्हा समन्वयक   प्रविण कु-हे  , महिंद्रा प्रेरणा चे सुहास पाटील व सर्व मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक टीम आर्वी यांनी सहकार्य केले . 
यावेळी एकूण २५० महिलांची महिंद्राच्या आरोग्य मोबाईल व्हॅन मार्फत मोफत तपासणी करण्यात आली. महिलांना मुक्त व्यासपीठ उपलब्द्ध करून दिल्यामुळे महिलांनी आपल्यातील वेग- वेगळ्या सुप्त गुणांचे सादरीकरण केले. सुत्रसंचालन कोमल अडसड -मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक पिंपळगाव, सोनल गव्हाणे तर आभार सोनल पवार यांनी मानले . सर्वांना भोजन देऊन कार्यक्रम संपन्न झाले.

सशक्त नारी, समर्थ भारत : १० विधवा मातांचा सन्मान​

महिलांनी महिलांच्या सन्मानासाठी आयोजित केलेला महिला दिन समारंभ -अर्थात पुर्ण कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी एकही पुरूष नव्हता. यानिमित्ताने
महिला दिनाचे औचित्य साधून "सन्मान असामान्य कर्तुत्वचा" या द्वारे  मुख्यमंत्री ग्रामसामाजीक परिवर्तक कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत मधील प्रत्येकी १ असा १० विधवा मातांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.  विदर्भ हा शेतकरी आत्महत्याग्रस्त भाग याने किंवा अन्य कारणाने विधवापण आलेल्या मातांनी  कुटुंबाची जबाबदारी एकटीवर असताना सुध्दा आपल्या मुलांना उत्तम संस्कार आणि शिक्षण देऊन देशाचे उत्तम नागरिक घडवले. त्यांच्या महान आणि खडतर अश्या प्रवासाला सलाम करण्याचा छोटासा प्रयत्न  कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आला.   Print


News - Wardha | Posted : 2019-03-10


Related Photos