प्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार , मतदानाला लागेल पूर्वीपेक्षा अधिक वेळ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / मुंबई :
  निवडणूक आयोगाने  ईव्हीएम सोबत व्हीव्ही पॅट मशीन वापरण्याचा निर्णय घेतला. यामुळे   मतदान यंत्राद्वारे दिलेले मत योग्य व्यक्तीला दिले की नाही हे समजण्यासाठी मतदानानंतर सात सेकंद संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह मतदान यंत्रावरील स्लिपवर दिसणार आहे. त्यामुळे मतदाराची खात्री पटणार असली, तरी प्रत्येक मतदार सात सेकंद अधिक वेळ घेणार आहे. त्यामुळे मतदानाला पूर्वीपेक्षा अधिक वेळ लागेल.
 ईव्हीएम यंत्राबाबत विविध शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यामुळे  आगामी लोकसभा निवडणुकीत वापरण्यात येणाऱ्या यंत्रात मतदान कोणाला दिले गेले, हे समजण्याची सुविधा देण्यात आली आहे. मतदारांमध्ये ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्राची माहिती देण्यासाठी आणि निवडणुकीच्या प्रक्रियेबाबत विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी जनजागृती केली जात आहे. 
 मतदान यंत्रावर मतदान केल्यानंतर त्याला जोडलेल्या व्हीव्हीपॅट यंत्रावर सात सेकंदांसाठी संबंधित उमेदवाराचे नाव, अनुक्रमांक आणि चिन्ह स्लिपवर दिसेल. त्यानंतर संबंधित स्लिप व्हीव्हीपॅट यंत्रामध्ये जाईल. या मुळे मतदाराला आपण केलेले मतदान योग्य व्यक्ती आणि चिन्हावरच गेले असल्याची खात्री पटेल.    Print


News - Rajy | Posted : 2019-03-10


Related Photos