गोंडवाना विद्यापीठातील प्रश्नांबाबत शिक्षक मंचाने साधला कुलगुरूंशी संवाद


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली : 
सद्यस्थितीत गोंडवाना विद्यापीठा बाबत विविध प्रश्नांबाबत उलट सुलट बोलले जात असतांना, एकदा कुलगुरूंशी संवाद साधुन त्यांची भुमिका समजावुन घ्यावी, विद्यार्थी शिक्षक आणि अन्य घटकांना अनेक प्रश्न मार्गी लावावे, या उद्देशाने गोंडवाना विद्यापीठ शिक्षण मंच, व्यवस्थापन परीषदेचे सदस्य, अधिसभा सदस्य, विवीध माहाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यपक तथा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या जम्बो शिष्टमंडळाने गुरूवारी दुपारी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर यांची भेट घेवुन चर्चा केली. 
तब्बल तीन तास चाललेल्या चर्चेत विवीध प्रश्न मार्गी लावण्यात आले. तर काही प्रश्नांवर मंचने आपली भुमिका जोरकस मांडत परिस्थिती बदली पाहीजे असा आग्रहही धरला. कुलगुरूंनी तेवढ्यातच सामंजस्यांने विवीध अडचणी समजुन घेत आपले मत मांडले.
  यावेळी कुलगुरू डाॅ. नामदेव कल्याणकर, प्र-कुलगुरू डाॅ. चंद्रशेखर भुसारी, कुलसचिव डाॅ. ईश्वर मोहुर्ले यांच्याशी गोंडवाना शिक्षण मंचाचे सचिव डाॅ. रूपेन्द्रकुमार गौर, डाॅ. अरूणाप्रकाश, डाॅ. सुरेश खंगार, डाॅ. हंसा तोमर, डाॅ. सचिन वझलवार, संजय रामगीरवार, प्रशांत दोंतुलवार, मनिष पांडे, डाॅ. परमानंद बावणकुळे, डाॅ. पराग धनकर, डाॅ. पंढरी वाघ, डाॅ. गजानन बन्सोड, डाॅ. उत्तम कांबळे, डाॅ. रवी धारपवार, यांच्यासह अन्य पदाधिकारी, सदस्यांनी तसेच अभाविपच्या  कार्यकर्त्यांनी चर्चा केली.
 विद्यापीठासंदर्भात नकारात्मक बातम्यांतुन विद्यापीठाची प्रतिमा मलिन होत असून, तसे कृत्य करणाऱ्या जवाबदार व्यक्तिंवर कारवाई व्हावी, विद्यापीठाच्या उन्हाळी २०१८ च्या परिक्षेच्या पुर्नमुल्यांकंन प्रक्रियेतील अवैध गुणवाढ प्रकरणातील दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अनेक वर्षापासुन विद्यापीठाने आचार्य पदवी करीता पीईटी परिक्षा घेतली नसल्याने नवसंशोधनास चालना मिळेनाशी झाली, या बाबत त्वरीत निर्णय घेवुन विद्यापीठस्तरावर पीईटी परीक्षेचे अयोजन करण्यात यावे. आचार्य पदवीसाठी कोर्सवर्क परीक्षेच्या निकालात झालेल्या संभ्रमाबाबत विद्यापीठाने भुमिका स्पष्ट करावी, इंग्रजी या विषयाच्या अभ्यासक्रम शैक्षणिक सत्राच्या मध्यंतरी बदलण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा  गोंधळ उडाला असुन, भविष्यात असे होवु नये या बाबत योग्य ती दक्षता घ्यावी तसेच अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षेकरीता नेमलेल्या परीक्षकांचे आणि विषय माॅडरेटरचे मानधन ४ ते ६ महिणे होवुनसुद्धा अप्राप्त आहेत. हे मानधन लवकरात लवकर अदा करण्याबाबत सुनिश्चित धोरण तयार करावे, समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यपकांच्या स्थाननिश्चिती संदर्भातील समस्यांची सोडवणुक त्वरीत करावी यासह अनेक मागण्यांचे सयुक्त निवेदन कुलगुरूंना देण्यात आले.
 या प्रसंगी डाॅ. चंद्रकांत डोर्लीकर, डाॅ. अशोक खोब्रागडे, डाॅ. किशोर वासुर्के, प्रा. यादव गहाणे, प्रा. प्रज्ञा वनमाळी, प्रा. योगेश पाटील, प्रा. विशाखा वंजारी, प्रा. गणेश चुधरी, तेजस मोहतुरे आदी मान्यवर उपस्थित होते.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-09


Related Photos