ठाणेगाव (जुने) जि. प. प्राथमिक शाळेतील विद्यार्थी तंत्रज्ञानात हुशार


- इंग्रजीचे पाढे तोंडपाठ 
- शैक्षणीक साहित्याच्या  मदतीने करतात अध्यापण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
मिथुन धोडरे / आरमोरी :
तालुक्यातील ठाणेगाव जुने  येथील पहिलीपासूनचे विद्यार्थी तंत्रज्ञानाचा अतिशय चांगल्या पद्धतीने वापर करीत आहेत. तंत्रज्ञानामुळे अध्ययन सुलभ होऊन, विद्यार्थांची चिकित्सक वृत्ती वाढते. जास्त वेळ एकाग्रता टिकून राहत असल्याने या शाळेतील विद्यार्थी अभ्यासातही हुशार असल्याचे डीआयईसिपिडिचे प्राचार्य डॉ. शरदचंद्र पाटिल यांनी केलेल्या पाहणीत दिसून आले आहे.
  शिक्षण विभागाचे मार्गदर्शन  व सहकार्य तसेच शिक्षकांचा प्रत्यक्ष सहभाग यामुळे जिल्हा परिषद शाळांचे रूप पालटण्यास सुरवात झाली आहे. काही जिल्हा परिषद शाळांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळांनाही मागे टाकले आहे. त्यातीलच एक शाळा म्हणजे , आरमोरी तालुक्यातील ठाणेगाव (जुनी वस्ती) येथील जि.  प.  शाळेचा प्रामुख्याने उल्लेख करावा लागेल.
  या शाळेत पहिली ते पाचवीपर्यंतचे वर्ग आहेत  व शिक्षक पदावर मुख्याध्यापिका बरडे, उमेश मसराम, उताने,भुरे, चांदेकर असे या शाळेत ४  शिक्षीका व १ शिक्षक आहेत. शाळेत सुमारे १६६ विद्यार्थी शिक्षण घेतात. शाळेचा परिसर अतिशय बोलका आहे. शाळेत विविध प्रकारची  फुलझाडे लावली आहेत. त्यामुळे शाळेला बगीचाचे स्वरुप प्राप्त झाले आहे प्रत्यक्ष कृतीतून व तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करण्यावर शिक्षकांचा भर असल्याने या शाळेची मुले खुप हुशार असल्याचे चाचणी दरम्यान दिसुन येते.
  इयत्ता पहिलीची  मुले वाचन व गमन करतात. १  ते २० पर्यंतच्या संख्या इंग्रजीमध्ये स्पेलिंग सह सांगतात. स्वताचा परिचय इंग्लिश मध्ये  सांगुन समोरच्या व्यक्तीला  इंग्लिश बोलायला भाग पाडतात. इंग्रजी बरोबर च हे विद्यार्थी मातृभाषा मराठी चे वाचन उत्तम प्रकारे करतात. दुसरीच्याही विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजी चे ज्ञान आहे. १५ पर्यंतचे पाढे या विद्यार्थ्यांना मुखपाठ आहेत. १० पर्यंत इंग्रजीतून टेबल म्हणून दाखवतात.
 गुणाकाराच्या क्रियाही करतात. तिसर्‍या व चौथ्या वर्गातील  विद्यार्थीही अभ्यासात व संभाषणात मागे नाहीत. शाळेचा परिसर,  विद्यार्थांची राहणीमान संभाषण ऐकल्यावर आपण एखाद्या नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळे मध्ये प्रवेश केला असल्याचा  भास निर्माण होतो. ठाणेगाव जिल्हा परिषद शाळेने  इतर शाळांसमोर  एक वेगळा आदर्श निर्माण केला असल्याचे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर किरमे यांनी सांगितले.

 विद्यार्थी शनिवारी शाळेत घालून जातात गांधी टोपी 

शनिवारी नियमित गणवेश व गांधी टोपी हा एकत्रित गणवेश ठरवुन दिला आहे. गळ्यामध्ये टाय,ओळखपत्र,पांढऱ्या रंगाचा हाप शर्ट व निळ्या रंगाचा पँट व डोक्यावर गांधी टोपी घातलेला विद्यार्थी शाळेत जात असताना नागरिकांचे लक्ष वेधून घेतात. या विद्यार्थ्यांनी गांधी टोपी च्या माध्यमातून शाळेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. आठवड्यातून एकदा या विद्यार्थ्यांना शाळेकडून जेवणाची विशेष मेजवानी दिली जाते. हे विशेष.  Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-09


Related Photos