भंडारा जिल्हयात ९३ हजार ३०१ बालकांना देणार पोलिओ डोज


- उद्या  पल्स पोलिओ लसीकरण 
विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / भंडारा :
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुध्दा भंडारा जिल्हयात पल्स  पोलिओ लीसकरण मोहिम 10 मार्च  ला राबविण्यात येणार आहे. सन 1995-96 पासून पोलिओ निर्मूलन करण्यासाठी भारतात विशेष पल्स पोलिओ राबविण्यात येत आहे. सन 2010 मध्ये डिसेंबर पर्यंत पाच पोलिओ रुग्ण आढळून आले होते. परंतु सन 2011 नंतर राज्यात एकही पोलिओ रुग्ण आढळून आलेला नाही. सदर निर्मूलनाकरीता आपण सर्वजण योगदान देत आहात. आपल्या अथक परिश्रमामुळेच 13 जानेवारी 2011 नंतर आजतागायत एकही पोलीओ रुग्ण आढळून आलेला नाही व भारताला पोलिओ निर्मूलनाचे प्रमाणपत्र मार्च 2014 मध्ये मिळालेले आहे.
पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेच्या फेरीकरीता भंडारा जिल्हयात एकूण 93 हजार 301 अपेक्षित लाभार्थी आहेत. त्यानुषंगाने जिल्हयात 33 प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 913 बुथ व शहरी भागातील 106 बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. सदर कार्यक्रमासाठी 2414 मनुष्यबळ उपलब्ध करण्यात आले आहेत. तसेच या मोहिमेंतर्गत अति जोखमेच्या क्षेत्रामध्ये सुध्दा लसीकरण करण्यात येणार आहे. जसे विट भट्टी, झोपडपट्टी, भटक्या जमाती, बांधकाम जागा व इतर मायग्रेटरी भागाचा यात सामावेश आहे. 
सदर मोहिमेसाठी  7 हजार व्हॉयल लसीचा साठा प्राप्त झाला आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामिण रुग्णालयात सदर मोहिमेसाठी सर्व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मोहिमेच्या अनुषंगाने सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की, ज्या प्रमाणे मागील सर्व मोहिमेत जास्तीत जास्त संख्येने बुथवर हजर राहून बालकांना पोलिओ डोज पाजून घेतले होते. त्याचप्रमाणे 10 मार्च 2019 ला सुध्दा जास्तीत जास्त संख्येने बुथवर उपस्थित राहून आपल्या 5 वर्षाखालील सर्व बालकांना पोलिओचा डोज पाजावा व आपल्या बाळाला संरक्षित करुन सहकार्य करावे. 
तसेच बसस्टॅड, रेल्वे स्टेशन, टोल नाका येथे 60 ट्रांझिट बुथची व्यवस्था करण्यात आली आहे. काही ठिकाणी 48 फिरते बुथची व्यवस्था आरोग्य विभागातर्फे करण्यात आलेली असून याचा लाभ जास्तीत जास्त जनेतेने घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी शांतनू गोयल व मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांनी केले आहे. 

   Print


News - Bhandara | Posted : 2019-03-09


Related Photos