गडचिरोली नगर पालिकेची अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई, सकाळपासूनच मोहिमेला प्रारंभ


विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
स्थानिक नगर परिषदेने शहरातील चारही मुख्य मार्गांवर तसेच बसस्थानक आणि इतर सार्वजनिक ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डींग्जवर कारवाई सुरू केली आहे. 
नगर पालिकेचे कर विभाग प्रमुख तथा नोडल अधिकारी रविंद्र भंडारवार यांनी सदर कारवाई सुरू केली आहे. शहरात मोठ्या प्रमाणात जाहिरातींचे होर्डींग्ज लावण्यात आलेले आहेत. मात्र अनेक होर्डींग्ज लावताना नगर पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. तसेच परवानगी घेवूनही मुदत संपल्यानंतरही काही होर्डींग्ज जैसे थे ठेवण्यात आले आहेत. यामुळे आज ९ मार्च रोजी सकाळीच होर्डींग्ज काढण्याची मोहिम सुरू करण्यात आली आहे. करविभागप्रमुख रविंद्र भंडारवार हे स्वतः उपस्थित राहून होर्डींग्ज काढून घेत आहेत. राज्य परिवहन महामंडळाच्या बसस्थानकापासून कारवाईस प्रारंभ करण्यात आला. शहरातील सर्वच ठिकाणी लावण्यात आलेल्या होर्डींग्जवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती भंडारवार यांनी दिली आहे. यापुढे नगर पालिकेच्या परवानगीशिवाय कोणतेही होर्डींग्ज लावू देणार नसल्याचेही ते म्हणाले.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-09


Related Photos