महत्वाच्या बातम्या

 तळागाळातील जनतेसोबत संवाद साधून भाजपचे विकास पर्व सर्वसामान्यांपर्यंत पोहचवावे : खा. अशोक नेते


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / गडचिरोली : गडचिरोली येथील गानली समाज सभागृह आरमोरी रोड गडचिरोली येथे आज २३ जून २०२३ रोजी संयुक्त मोर्चा संमेलन संपन्न झाले. या महाजनसंपर्क अभियानांतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व मोर्चा व आघाडीचे संयुक्त मोर्चा संमेलन आयोजित करण्यात आले. 

या संमेलनाचे अध्यक्ष गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे लोकप्रिय खासदार अशोक नेते, प्रमुख पाहुणे गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ. देवराव होळी, प्रदेश सरचिटणीस एस.टी मोर्चाचे प्रकाश गेडाम, संयुक्त मोर्चा संयोजक अनिल पोहनकर, जेष्ठ नेते रमेश भुरसे, जिल्हा संयोजक, प्रशांत भुगुवार, बंगाली समाज आघाडीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश शहा, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, तालुका अध्यक्ष चामोर्शी दिलिप चलाख, धानोरा तालुकाध्यक्ष शशिकांत साळवे, महिला आघाडीच्या तालुका अध्यक्ष तथा माजी जि.प. सदस्या लता पुन्घाटे, महिला मोर्चाचे महामंत्री वर्षा शेडमाके उपस्थित होते. 

विधानसभा क्षेत्रातील समस्त मोर्चाच्या पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितांना गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, प्रकाश गेडाम संयुक्त मोर्चा संयोजक अनिल पोहनकर, जिल्हा संयोजक प्रशांत भुगुवार यांनी मार्गदर्शन केले. 

या संमेलनाला गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात बोलतांना सांगीतले, भारत व जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्र सरकार ९ वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्याने या महा-जनसंपर्क अभियान निमित्याने तमाम पदाधिकारी कार्यकर्ते यांनी तळागाळातील सर्वसामान्य जनते सोबत संवाद साधावा व भाजपच्या वतीने देशभरात करण्यात आलेल्या विकास पर्व जनतेपर्यंत पोहचवावे असे आवाहन केले. 

या संयुक्त आघाडी मोर्चा संमेलनास गडचिरोली विधानसभा मतदार संघातील समस्त मोर्चा पदाधिकारी तथा महीला आघाडी पदाधिकरी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 





  Print






News - Gadchiroli




Related Photos