लाखो भाविकांनी घेतले मार्कंडेश्वराच्या पालखीचे दर्शन


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
 प्रतिनिधी / चामोर्शी  : 
 विदर्भाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मार्कंडा देवस्थान येथे ४ मार्च रोजी महाशिवरात्री पासून यात्रेला सुरवात झाली आहे. आज ८ मार्च रोजी यात्रेच्या पाचव्या दिवशी  भगवान मार्कंडेश्वराची पालखी काढण्यात आली. यावेळी  उपस्थित लाखो भाविकांनी मार्कंडेश्वराच्या पालखीचे दर्शन घेतले. महाशिवरात्रीनंतर दोन-तीन दिवसांनी पालखी काढण्याची अखंडीत परंपरा अनेक वर्षापासून जोपासल्या जात असून पालखीचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहून दर्शन घेतात. यावर्षी  यात्रा सुरू होऊन  पाच दिवसाचा कालावधी लोटला असून  या कालावधीत  मृत पावलेल्या व्यक्तींच्या नावाने मार्कंडेश्वराच्या चरणी आंघोळ केल्यास  त्याला  मोक्ष मिळतो, अशी भावना भाविकांमध्ये आहे.  त्यामुळे विदर्भाच्या काशीत महाशिवरात्रीपासून भाविकांचा कुंभमेळा जमतो. आज शुक्रवारी पालखीचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक मार्कंडा येथे दाखल झाले होते. 
 पालखी सोहळळ्यात मार्कंडा देवस्थानचे अध्यक्ष  गजानन भांडेकर, सचिव मृत्यूंजय गायकवाड, मराठा धर्मशाळेचे उपाध्यक्ष रामेश्वर काबरा, उमाजी जुनघरे, पिपरे महाराज, भाजपा तालुकाध्यक्ष दिलीप  चलाख, जयरामजी चलाख, जि.प.सदस्य अतुल गण्यारपवार,  साधना गण्यारपवार, तहसीलदार अरूण येरचे आदी उपस्थित होेते.  पालखी मार्कंडा देवस्थानातून काढून मुख्य मार्गाने फिरविण्यात आली.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-08


Related Photos