'महिला दिनी नक्षलवाद विरोधात महिलांचा आक्रोश' : आदिवासी महिला विकास साखळीत १२ हजार महिलांचा सहभाग


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / गडचिरोली :
आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्ताने गडचिरोली पोलीस दलाव्दारे ‘‘बेबी मडावी - आदिवासी महिला विकास साखळी’’ चे आयोजन करण्यात आले होते. 
आज सकाळपासुन इंदिरा गांधी चैक ते पोलीस मुख्यालय गडचिरोलीच्या मुख्य कवायत मैदानापर्यंत तर इंदिरा गांधी चैक ते पोटेगांव रोड पर्यंत हातात हात घालुन रस्त्याच्याकडेने तब्बल १२ हजार महिला/तरूणींनी सुमारे ८  कि.मी लांबीची साखळी तयार करून आंतरराष्ट्रीय महिला दिनाचा व नक्षल्यांनी खुन केलेल्या बेबी मडावी हिच्या नावाचा जयघोष  करत तसेच आदिवासी विकासात नेहमीच आडकाठी निर्माण करणा-या नक्षलवाद्यांविरोधात जोरदार घोषणा देत यापुढे आमच्या आदिवासी समाजाच्या कोणत्याही तरुणीचा छळ कराल तिला तिच्या अधिकारांपासून वंचित कराल तर याद राखा असा नारा देत उपस्थित महिलांनी नक्षलवाद समुळ नष्ट करण्यासाठी यापुढे नेहमीच महिला मोठया प्रमाणात पोलीसांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार असल्याचे स्पष्ट केले. 
क्रमाची सुरूवात सकाळी १० वा. पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंग , पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे , अपर पोलीस अधीक्षक (अभियान) हरी बालाजी ,  अपर पोलीस अधीक्षक ( (नक्षल सेल) ) मोहित कुमार गर्ग , नगराध्यक्षा  योगीता पिपरे  यांच्या उपस्थितीत इंदिरा गांधी चैक येथे बेबी मडावी हिच्या प्रतिमेचे पुजन विकास साखळीला उपस्थित महिलांच्या हस्ते करण्यात आले.
याचबरोबर २ मिनिटे शांतपणे उभे राहून मौन पाळुन बेबी मडावी हिला श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच यावेळी राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत रनिंग प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली रीना सुकरू गावडे, राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत उंच उडी या प्रकारामध्ये प्रथम क्रमांक मिळविलेली किरण धिसु मडावी,स्क्वे मार्षल आर्ट या क्रिडा प्रकारात दैदिप्यमान यश मिळविणारी तसेच राष्ट्रपतींच्या हस्ते ‘राष्ट्रीय बालशक्ती पुरस्कार २०१९’ ने सन्मानित करण्यात आलेली एंजल विजय देवकुळे या गडचिरोली जिल्हयाचे नाव लौकीक करणाऱ्या ३ तरूणींचा  पोलीस उपमहानिरीक्षक अंकुष शिंदे यांचे हस्ते गडचिरोली दलातर्फे खास स्मृतीचिन्ह व पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला .
 बेबी मडावी, रा. इरपनार, ता. भामरागड या तरूणीचा निघृणपणे खुन करणा-या नक्षलवादयांचा निषेध नोंदवत नक्षलवादी नेहमीच आदिवासी बांधव व भगिनींच्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक प्रगतीत अडथळा निर्माण करतात ही आदिवासी तरूणींच्या विकासाच्या वाटेवर त्यांना सदैव साथ देण्यासाठी या आदिवासी महिला विकास साखळीचे आयोजन गडचिरोली पोलीस दलातर्फे करण्यात आले असल्याचे तसेच या आदिवासी महिला विकास साखळीला दुर्गम
व अतिदुर्गम भागातून मिळालेल्या महिलांच्या प्रचंड अशा प्रतिसादामुळे व महिलांनीच स्वयंस्फुर्तीने नक्षलवाद हटाव आदिवासी बचाव हा नारा दिला असल्याने प्रचंड असा प्रतिसादामुळे गडचिरोलीतून येत्या २  ते ३ वर्षात नक्षलवाद निश्चित संपेल असे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी स्पष्ट केले. 
यावेळी  जिल्हाधिकारी शेखर सिंग  व मा.  पोलीस अधीक्षक शैलेष बलकवडे यांनी इंदिरा गांधी चैक ते पोलीस मुख्यालय गडचिरोली पर्यंत स्वतः साखळीचे नेतृत्व केले. यावेळी मोठया प्रमाणात नागरिक तसेच पत्रकार बांधव उपस्थित होते.   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-08


Related Photos