राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे गडचिरोली शहरात धुळीने नागरीक त्रस्त


- आरोग्य धोक्यात, पाणी मारण्याची गरज
विदर्भ न्यूज एक्सप्रेस
प्रतिनिधी / गडचिरोली :
शहरातून सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वाहतूकीची प्रचंड समस्या उद्भवली आहे. सोबतच नागरीकांना प्रचंड धुळीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले असून नियोजशुन्य कामामुळे नागरीकांनी प्रचंड रोष व्यक्त केला आहे.
शहरातील धानोरा मार्ग तसेच चंद्रपूर मार्गावर पोलिस ठाण्यापासून राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला काही दिवसांपासून सुरूवात करण्यात आली आहे. जुना रस्ता उखडून टाकून नवीन मुरूम, गिट्टी टाकण्यात येत आहे. या कामावर मोठ्या प्रमाणात अवजड वाहनांचा वापर होत आहे. तसेच वाहतूक ऐकेरी करण्यात आली आहे. यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय मुरूमामुळे रस्त्यावर प्रचंड धुळ साचली आहे. वाहने गेल्यावर ही धुळ उडत असल्याने समोरील वाहनसुध्दा दिसून येत नाही. तसेच श्वसनाचा त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे काम सुरू असताना पाणी मारण्याची मागणी रूचित वांढरे यांनी केली आहे.

   Print


News - Gadchiroli | Posted : 2019-03-08


Related Photos