महत्वाच्या बातम्या

 २१ बौद्ध राष्ट्रांचे प्रतिनिधी दीक्षाभूमीला देणार भेट


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 

प्रतिनिधी / नागपूर : गगन मलिक फाऊंडेशन इंडिया, सर्वधर्म समभाव शांती संमेलन व जागतिक शांतता पुरस्कार सोहळा-२०२३ चे आयोजन मध्यप्रदेशातील बैतूल जिल्ह्यातील आमला शहरात २५ जून रोजी करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे २१ बौद्ध देशांतून प्रतिनिधी शनिवारी नागपुरात येणार आहेत. रविवारी ते दीक्षाभूमीला भेट देतील.

श्रीलंकेचे सामाजिक न्याय मंत्री विजयदासा राजबक्षे, लाईट एशिया फाउंडेशन श्रीलंकाचे अध्यक्ष नवीन गुणरत्ने, वैयक्तिक सहाय्यक पंतप्रधान कार्यालय श्रीलंका सोक्या चोम, थायलंडचे बौद्ध विश्व आघाडीचे अध्यक्ष डॉ. पोर्नचाई पियापोंग, सिस्टर मिथिला (बांगलादेश), सबुज बरुवा (बांगलादेश), सिस्टर निन्ये (म्यानमार), डॉ. ली. कीट यांग (दुबई), फाय यान (व्हिएतनाम), डॉ. योंग मून (दक्षिण कोरिया), कॅप्टन नॅटकीट (थायलंड), डॉ. पोंगसांग (थायलंड ) आणि इतर देशांतील बौद्ध प्रतिनिधी येणार आहेत.

हे सर्व बौद्ध प्रतिनिधी २५ जून रोजी सकाळी ७ वाजता दीक्षाभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थीकलशाचे दर्शन घेऊन अभिवादन करतील. यानंतर ते बैतूलकडे नियोजित कार्यक्रमासाठी रवाना होतील. यावेळी गगन मलिक फाऊंडेशन इंडियाचे अध्यक्ष गगन मलिक उपस्थित राहतील. अशी माहिती गगन मलिक फाऊंडेशन इंडियाचे समन्वयक नितीन गजभिये यांनी दिली.





  Print






News - Nagpur




Related Photos