महत्वाच्या बातम्या

 ॲड. मंजू लेडांगे यांच्या समयसूचकतेमुळे वाचले मानसिकरीत्या दुर्बळ मुलीचे प्राण


विदर्भ न्यूज एक्सप्रेस 
प्रतिनिधी / चंद्रपूर : २२ जून २०२३ ला रात्री १०:०० वाजताच्या जवळपास चंद्रपूर बस स्थानक समोर बसलेली एक अज्ञात युवती (वय अंदाजे १५ ते २० वर्ष) ॲड. मंजू लेडांगे व त्यांच्या कार्यकर्त्यांना आढळली. त्या मुलीजवळ जाऊन तिची विचारपूस केली असता ती मुलगी संभवतः अल्पवयीन आहे. आणि मानसिक रित्या दुर्बळ असून संभवतः तिच्या वर लैंगिक किंवा शारारिक अत्याचार झाले असू शकते. अशे संशय निर्माण झाले. जर त्या मुलीला सुरक्षित ठिकाणी स्थानांतरित केले नाही तर त्या मुलीसोबत अपघात/धोका होऊ शकतो किंवा असामाजिक तत्वांद्वारे त्या मुलीचा गैरवापर होऊ शकतो. असे उपस्थित स्वयंसेवकांना जाणविले.

यानंतर चंद्रपूर रामनगर पोलीस ठाणे येथे या घटनेची माहिती देण्यात आली. व चंद्रपूर पोलिस विभागाचे अधिकारी हे घटनास्थळवर हजर झाले आणि ॲड. मंजू लेडांगे व त्यांच्या कार्यकर्त्यां मार्फत त्या मुलीची काळजीने समजूत घालून तिला रामनगर पोलीस ठाणे येथे आणण्यात आले. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ॲड. आशिष धर्मपुरीवार, ॲड. आशिष मुंधडा, अमित भारद्वाज, अभिषेक मोहूरले रामनगर पोलीस ठाणे येथे उपस्थित झाले.

बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांना संपर्क करून विचारपूस केली असता, ही मुलगी मागील वर्षी सुद्धा अशाच परिस्थिती मध्ये आढळली होती. अशी माहिती मिळाली. रात्री १२:०० वाजताच्या जवळपास रामनगर पोलीस ठाणे आणि चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालय येथील पोलीस व वैद्यकीय अधिकारी यांना बाल कल्याण समिति अध्यक्ष क्षमा बासरकर धर्मपुरीवार यांच्या तर्फे त्वरित मुलीची वैद्यकीय तपासणी करण्यात यावी, अशी सूचना देण्यात आली. बाल कल्याण समिति अध्यक्ष क्षमा बासरकर धर्मपुरीवार व बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर यांच्या तर्फे पोलीस विभाग व जिल्हा रुग्णालय मध्ये समन्वय साधण्यात आले.

त्यानंतर त्या मुलीला चंद्रपूर पोलीस विभागा तर्फे ॲड. आशिष मुंधडा व अभिषेक मोहूरले (बाल संरक्षण समिती) यांच्या उपस्थितीत चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी करीता आणण्यात आले. कार्यरत डॉक्टरांना ती मुलगी वैद्यकीय तपासणीसाठी अजिबात सहकार्य करीत नसल्याचे आढळले व त्यामुळे ती मानसिक रित्या दुर्बळ आहे. असे लक्षात आले आणि जवळपास रात्रीचे ०२:०० वाजता मानसिक रोग तज्ञ डॉक्टरांना संपर्क करून त्यांच्यातर्फे त्या मुलीची मानसिक तपासणी करण्यात आली. मानसिक तपासणीत ही मुलगी मानसिक रुग्ण (शिझोफ्रेनिक) आहे. असे स्पष्ट झाले. पुढे चंद्रपूर पोलीस विभागा तर्फे चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी (मेडिकल एगजामिनेशन) होणार आहे व त्या मुलीवर शारीरिक किंवा लैंगिक अत्याचार झालेले आहे किंवा नाही हे तिच्या वैद्यकीय तपासणी नंतरच स्पष्ट होईल.

चंद्रपूर जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसिक तपासणी झाल्यानंतर ॲड. विजया बांगडे यांच्या द्वारे संचालित स्वाधार गृह महिला आश्रयस्थान/वसतिगृह येथे संपर्क करण्यात आले. आणि पहाटे ०४:०० वाजता ॲड. आशिष मुंधडा व सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे (A.P.I.) ईतर पोलीस अधिकाऱ्यांसोबत त्या मुलीला घेऊन कृष्ण नगर, मुल रोड, चंद्रपूर येथे स्थित स्वाधार गृह महिला आश्रयस्थान/वसतिगृह येथे हजर झाले आणि सध्या त्या मुलीला महिला आश्रयस्थान येथे स्थानांतरित करण्यात आले.

यावेळी ॲड. मंजू लेडांगे (कार्यकारणी सदस्य, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन), महेश वासलवार (म.न.से.), ॲड. आशिष धर्मपुरीवार (सचिव, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन), बाल कल्याण समिति अध्यक्ष क्षमा बासरकर धर्मपुरीवार, बाल संरक्षण अधिकारी अजय साखरकर, अभिषेक मोहूरले (बाल संरक्षण समिती), डॉ. श्रीरामे व तानाजी शिंदे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर., सहायक पोलीस निरीक्षक योगेश हिवसे आणि ईतर पोलिस अधिकारी व कर्मचारी,इंदु चवरे (स्वाधार महिला आश्रयस्थान), अमित भारद्वाज (सामाजिक कार्यकर्ता), ॲड. आशिष मुंधडा (कार्यकारणी सदस्य, चंद्रपूर जिल्हा बार असोसिएशन), विजय तुरक्याल, सुनील गुडे, अंकीत लांजेवार व ईतर जागरूक नागरिकांनी सहकार्य केले.





  Print






News - Chandrapur




Related Photos